अनिश कुलकर्णीला गणित ऑलिंपियाडमध्ये रौप्यपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:09 AM2021-07-26T04:09:17+5:302021-07-26T04:09:17+5:30

अनिश हा भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ६ विद्यार्थ्यांच्या संघात होता. या वर्षी भारतीय संघाने ५ पदके ज्यामध्ये एक सुवर्ण, एक ...

Anish Kulkarni wins silver in Maths Olympiad | अनिश कुलकर्णीला गणित ऑलिंपियाडमध्ये रौप्यपदक

अनिश कुलकर्णीला गणित ऑलिंपियाडमध्ये रौप्यपदक

Next

अनिश हा भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ६ विद्यार्थ्यांच्या संघात होता. या वर्षी भारतीय संघाने ५ पदके ज्यामध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे. त्यापैकी पुण्याच्या विद्यार्थ्यांनी २ पदके पटकावली. अनिशने रौप्यपदक आणि अनन्या रानडे हिने कांस्यपदक जिंकले.

अनिशला लहानपणापासूनच गणिताची आवड होती. तो आठवीपासून आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडची तयारी करत आहे. २०२० मध्ये भारताचा सहभाग रद्द झाल्याने आणि २०१९ मध्ये थोडक्यात टीममध्ये संधी हुकली तरी निराश न होता त्याने २०२१ मध्ये संघात सहभाग मिळविला. सध्या तो स्व. पी. बी. जोग ज्युनियर कॉलेजमध्ये १२ वी इयत्तेत शिकत आहे. त्याला एम प्रकाश संस्था व भास्करचार्य प्रतिष्ठान यांचे मार्गदर्शन लाभले. एम प्रकाश, किरण बर्वे, सुबोध पेठे, प्रशांत सोहनी आणि इतर शिक्षकांनी त्याला या प्रवासात मदत केली आहे.

--------------------------------

फोटो : अनीश कुलकर्णी

Web Title: Anish Kulkarni wins silver in Maths Olympiad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.