महर्षी शिंदे पुलावर अंनिसचे धरणे आंदोलन
By admin | Published: February 21, 2015 01:51 AM2015-02-21T01:51:34+5:302015-02-21T01:51:34+5:30
महाराष्ट्र अंधशद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला दीड वर्ष पूर्ण झाले,
पुणे : महाराष्ट्र अंधशद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला दीड वर्ष पूर्ण झाले, त्याचबरोबर नुकताच कोल्हापूर येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला करण्यात आला. दोन्ही घटनांमध्ये खूपच साम्य असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने यंत्रणा हलवून दोन्ही प्रकरणांचा छडा लावावा, अशी मागणी नरेंद्र दाभोलकरांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी केली.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला दीड वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर अंनिस आणि इतर पुरोगामी पक्ष-संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी मुक्ता दाभोलकर, अंनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, शहर कार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी, भारिप-बहुजन महासंघाच्या महिलाध्यक्षा वैशाली चांदणे, नंदिनी जाधव, दीपक गिरमे उपस्थित होते. या वेळी घोषणा देण्यात आल्या. (प्रतिनिधी)
च्दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला असून, खुनी पकडण्यात अपयश आले आहे. या घटनेला दीड वर्ष होऊन गेले. खून करणाऱ्याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, अशी मागणी मुक्ता दाभोलकर यांनी या वेळी केली. दाभोलकर यांच्या हत्येशी साधर्म्य असलेली दुसरी घटना सहजपणे डोळ्यांत भरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी कोल्हापुरात पानसरे यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.