अनिता पाध्ये आणि ॲड. प्रमोद आडकर यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:15 AM2021-08-28T04:15:50+5:302021-08-28T04:15:50+5:30
पुणे : दादा कोंडके फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार (२०२० आणि २०२१ ) अनुक्रमे दादा कोंडके यांच्या जीवनावर ...
पुणे : दादा कोंडके फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार (२०२० आणि २०२१ ) अनुक्रमे दादा कोंडके यांच्या जीवनावर आधारित ‘एकटा जीव’ या आत्मचरित्राच्या लेखिका अनिता पाध्ये आणि रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांना जाहीर झाला आहे.
सोमवार (दि. ३० ) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात सायंकाळी ४ वाजता माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून, महावितरण पुणे कार्यालयाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती दादा कोंडके फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त आणि कार्यक्रमाचे निमंत्रक मनोहर कोलते यांनी कळविली आहे.
यावेळी प्रमुख जिल्हा सरकारी वकील ॲड. एन. डी. पाटील, उद्योगपती नितीन थोपटे, आदिवासी लघुपटांचे निर्माते डॉ. कुंडलिक केदारी, समाज प्रबोधन कार्याच्या कीर्तनरूपी सेवेबद्दल पूनम जाचक आणि स्केटिंग या खेळात देशपातळीवर सुवर्णपदक मिळविल्याबद्दल वैदही आणि श्रुतिका सरोदे या मान्यवरांचा २०२० या वर्षासाठी विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच २०२१ या वर्षासाठी विद्युत वितरण नियंत्रण समितीचे पुणे जिल्हा सदस्य रवींद्र गायकवाड आणि ह्युमन राईटसचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमरसिंह राजपूत (परदेशी) या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.
-----------------------------