अण्णा भाऊंना भारतरत्न द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 03:29 AM2017-08-02T03:29:47+5:302017-08-02T03:29:47+5:30
रशियन तसेच अन्य अनेक भाषांमध्ये ज्यांच्या साहित्याचे अनुवाद झाले, त्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी किताब द्यावा
पुणे : रशियन तसेच अन्य अनेक भाषांमध्ये ज्यांच्या साहित्याचे अनुवाद झाले, त्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी किताब द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने करण्यात आली.
केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत अण्णा भाऊ साठे यांची जयंती पक्षाच्या वतीने साजरी करण्यात आली. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे या वेळी उपस्थित होते. सारसबाग येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर झालेल्या सभेत जाहीरपणे अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष महेंद्र कांबळे होते.
या वेळी हनुमंत साठे, परशुराम वाडेकर, महेश शिंदे, महिपाल वाघमारे, शशिकला वाघमारे, नगरसेविका सुुनीता वाडेकर, सोनाली लांडगे, माजी नगरसेवक अशोक कांबळे, लियाकत शेख, सुन्नाबी
शेख, किरण भालेराव, संदीप
धांडोरे, रोहित कांबळे आदी
उपस्थित होते.