"अण्णा हे देशाला मिळालेले दुसरे महात्मा गांधी..." महादेव जानकरांनी अण्णा हजारेंची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 04:09 PM2023-07-27T16:09:17+5:302023-07-27T16:13:22+5:30
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे भेट घेत आशीर्वाद घेतले...
शिरूर (पुणे) : माजी मंत्री महादेव जानकर यांचे राष्ट्र हेच माझे कुंटुब आहे असे समजून राज्यात व देशात वंचित घटकाला राजकीय प्रवाहात आणण्यासाठी करीत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी केले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जन स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जनस्वराज्य यात्रा पुणे अहमदनगर महामार्गावर शिरूरजवळील बेलवंडी फाटा येथे आल्यावर शिरूर पारनेर श्रीगोंदा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी यात्रेचे ढोल वाजवीत जोरदार स्वागत केले. त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे भेट घेत आशीर्वाद घेतले. त्यावेळी प्रदीर्घ चर्चा झाली.
यावेळी महादेव जानकर म्हणाले की, ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी माहितीचा अधिकार, लोकपाल बिल यासाठी प्राणाची बाजी लावत देशातील जनतेला एक क्रांतिकारी शस्त्र हातात दिले आहे. हजारे हे तरुणांसाठी आदर्श व प्रेरणादायी असून त्यांच्याच रूपाने या देशाला मिळालेले दुसरे महात्मा गांधी आहेत.