ऐन दिवाळीत घरात अंधार

By Admin | Published: October 23, 2014 05:12 AM2014-10-23T05:12:49+5:302014-10-23T05:12:49+5:30

परिसरातील जवळपास अडीच हजार ग्राहकांकडे महावितरणची जवळपास एक कोटी थकबाकी असल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करून तीन दिवसांत ७० लाख रुपयांची वसुली करण्यात आली.

Anne in the house in Diwali | ऐन दिवाळीत घरात अंधार

ऐन दिवाळीत घरात अंधार

googlenewsNext

रावेत : बिजलीनगर कार्यालयांतर्गत बिजलीनगर, गिरीराज सोसायटी, नागसेननगर, गुरुद्वारा चौक परिसर, जाधव वस्ती, शिंदे वस्ती, चिंतामणी चौक, वेताळनगर, वाल्हेकरवाडी, आकुर्डी रेल्वे स्टेशन, उद्धवनगर, बळवंतनगर, चिंचवडेनगर, रावेत आदी भागातील थकबाकीदार ग्राहकांचे घरगुती वीजजोड तोडले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत थकबाकीदारांच्या घरी अंधार करून महावितरणाने शॉक दिला.
परिसरातील जवळपास अडीच हजार ग्राहकांकडे महावितरणची जवळपास एक कोटी थकबाकी असल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करून तीन दिवसांत ७० लाख रुपयांची वसुली करण्यात आली. ५००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त थकबाकी असणारे ४७१ आहेत. ५००० रुपयांपर्यंत थकबाकीदार असणारे २००० ग्राहक असून या सर्व ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करून कारवाई करण्यात आली, अशी माहिती महावितरणच्या बिजलीनगर कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अभियंता दिलीप पवार यांनी दिली. ग्राहक घरी नसताना सुद्धा महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी वीज मीटर काढून आणल्यामुळे घरी परतल्यानंतर अनेक ग्राहकांना वीज का गायब झाली हे लवकर लक्षात येत नव्हते. वीज मीटर काढून नेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांची एकच धावपळ उडाली. थकबाकी पूर्ण भरल्याशिवाय वीजप्रवाह सुरू केला जाणार नाही अशी भूमिका महावितरण अधिकाऱ्यांंनी घेतल्यामुळे काही वेळ नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. परंतु अधिकारी ठाम असल्यामुळे नागरिकांना पूर्ण थकबाकी भरण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे नागरिक पैशाची तडजोड करून थकबाकी महावितरणाच्या कार्यालयात भरत होते. पैसे भरण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा कार्यालयाच्या बाहेर लागल्या होत्या. थकबाकी भरल्यानंतर लगेचच ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू केला जात होता. सतत तीन दिवस झालेल्या या कारवाईमुळे महावितरणकडे ७० लाख एवढी रक्कम जमा झाली.(प्रतिनिधी)

Web Title: Anne in the house in Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.