अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 12:38 PM2021-08-05T12:38:17+5:302021-08-05T12:45:25+5:30

पुण्यामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटित काम करण्यासाठी शाखा सुरू होत आहे, ही आनंददायी घटना

Annis's Shivajinagar Pune branch executive announced | अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेची कार्यकारिणी जाहीर

अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेची कार्यकारिणी जाहीर

Next
ठळक मुद्देअंनिसच्या कार्यकर्त्यांनी चर्चा करून पदनिवड प्रक्रिया पूर्ण केली

पुणे : महाराष्ट्र अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी वनिता फाळके, कार्याध्यक्षपदी संदीप कांबळे, सचिवपदी विनोद खरटमोल यांची निवड करण्यात आली आहे. ही कार्यकारिणी २०२१ - २२ या वर्षासाठी असणार आहे.

याप्रसंगी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. पुण्यामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटित काम करण्यासाठी शाखा सुरू होत आहे, ही आनंददायी घटना आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे संघटितपणे काम करणे हे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंनिसचे प्रधानसचिव संजय बनसोडे यांनी केले. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी चर्चा करून पदनिवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.  यावेळी संजय बनसोडे आणि विशाल विमल यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

अध्यक्ष : वनिता फाळके, उपाध्यक्ष : लालचंद कुंवर, कार्याध्यक्ष : संदीप कांबळे, सचिव : विनोद खरटमोल, सहसचिव : घनश्याम येणगे, विविध उपक्रम विभाग कार्यवाह : प्रा. हर्षदकुमार मुंगे, सहकार्यवाह : मयूर पटारे, वैज्ञानिक जाणिवा विभाग कार्यवाह : रविकिरण काटकर, बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह : सचिन नेलेकर, सहकार्यवाह : प्रवीण खुंटे, युवा विभाग कार्यवाह : आकाश छाया, महिला विभाग कार्यवाह : अँड. परिक्रमा खोत, सहकार्यवाह : अश्विनी कोळेकर, निधी संकलन विभाग, कार्यवाह : रुपेश जगताप, सोशल मीडिया विभाग कार्यवाह : रोहित घोगरे, सहकार्यवाह : कबीर भुपेशराज, कायदे विभाग सल्लागार : अँड. संदीप गुंजाळ, सहसल्लागार : अँड स्नेहल गिरी यांची निवड करण्यात आली आहे.

Web Title: Annis's Shivajinagar Pune branch executive announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.