भाजपाचा वर्धापनदिन : निमंत्रणपत्रिकेत महापौरांचे नाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 03:40 AM2018-04-04T03:40:41+5:302018-04-04T03:40:41+5:30

गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या भारतीय जनता पार्टीचा ३८ वा वर्धापनदिन ६ एप्रिलला मुंबईत राज्यस्तरावर व ८ एप्रिलला पुण्यात स्थानिक स्तरावर साजरा होत आहे. त्यासाठी पुण्यात आयोजित मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेतून महापौर मुक्ता टिळक यांचे नावच वगळण्यात आले आहे.

Anniversary of BJP: There is no name of mayor in invitation Card | भाजपाचा वर्धापनदिन : निमंत्रणपत्रिकेत महापौरांचे नाव नाही

भाजपाचा वर्धापनदिन : निमंत्रणपत्रिकेत महापौरांचे नाव नाही

Next

पुणे - गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या भारतीय जनता पार्टीचा ३८ वा वर्धापनदिन ६ एप्रिलला मुंबईत राज्यस्तरावर व ८ एप्रिलला पुण्यात स्थानिक स्तरावर साजरा होत आहे. त्यासाठी पुण्यात आयोजित मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेतून महापौर मुक्ता टिळक यांचे नावच वगळण्यात आले आहे.
समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, सहयोगी खासदार संजय काकडे तसेच शहरातील आमदारांचीही नावे या पत्रिकेत नाहीत. विशेष म्हणजे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत भाजपाचेच आमदार आहेत. तरीही त्यांना स्थान देण्यात आलेले नाही. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट तसेच पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांचीच नावे या पत्रिकेत आहेत. येत्या ६ एप्रिलला पक्षाचा वर्धापनदिन आहे. तो मुंबईत साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त तिथे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. पुण्यातून किती कार्यकर्ते जाणार, कोण नेणार याचे नियोजन करण्यासाठी झालेल्या बैठकीत आमदार व नगरसेवक यांच्यात जबाबदारी घेण्यावरून काही शाब्दिक वाद झाले होते. तसेच पक्षाच्या १०१ नगरसेवकांपैकी तब्बल ३० नगरसेवक व खासदार काकडे या बैठकीला अनुुपस्थित होते. त्यावरून
पक्षात अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा आहे.

विकासकामांची माहिती देणाऱ्या फलकांचे प्रदर्शन
मुंबईतील कार्यक्रमानंतर पुण्यात ८ एप्रिलला कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. रमणबाग येथे सायंकाळी ६ ते ८ या वेळात हा मेळावा होईल. त्या वेळी केंद्र व राज्य सरकार तसेच महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या विविध विकासकामांची माहिती देणाºया फलकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.
याच कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत महापौर तसेच महापालिकेच्या अन्य पदाधिकाºयांची नावे वगळण्यात आली आहे. महापौर हे पुण्याचे प्रथम नागरिक आहेत. पक्षासाठी ही गौरवाची बाब आहे, किमान त्यांचे नावतरी टाकायला हवे होते, असे काही कार्यकर्त्यांचे मत आहे.

पक्षाचे काही शिष्टाचार आहेत, ते माहिती नसलेल्यांकडून ही टीका होत आहे. हा पक्षसंघटनेचा कार्यक्रम आहे. महापौर हे पुण्याचे प्रथम नागरिक आहेत. त्यांचे नाव पक्षसंघटनेच्या कार्यक्रमात येणे योग्य नाही. केंद्रीय मंत्री, पालकमंत्री व शहराध्यक्ष यांची नावे असणे पक्षाच्या नियमाला धरून आहे.
- योगेश गोगावले,
शहराध्यक्ष, भाजपा

Web Title: Anniversary of BJP: There is no name of mayor in invitation Card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.