अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2015 06:06 AM2015-06-09T06:06:11+5:302015-06-09T06:06:11+5:30

दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने सोमवारी अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले.

Announce the eleventh admission schedule | अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

Next

पुणे : दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने सोमवारी अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार विद्यार्थ्यांना मंगळवारपासून आॅनलाईन प्रवेश अर्जातील दुसरा भाग भरता येईल. ही संपूर्ण प्रक्रिया दि. १४ जुलैपर्यंत चालणार असून, दि. १५ जुलैपासून अकरावीचे नियमित वर्ग सुरू होणार आहेत. केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष व शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

एटीकेटीचे वेळापत्रक नंतर...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावीच्या दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटीच्या सुविधेचा लाभ मिळतो. त्यानुसार त्यांना अकरावीत प्रवेश दिला जातो. मात्र, या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेनंतर स्वतंत्रपणे राबविली जाणार आहे. या प्रक्रियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.

हे प्रवेश होतील महाविद्यालय स्तरावर...
किमान कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रम, गृहनिर्माण , व्यवस्थापन, अल्पसंख्याक व इनहाउस कोट्याचे प्रवेश
तांत्रिक कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश. रात्र कनिष्ठ महाविद्यालयीन प्रवेश, हिंदी व उर्दू माध्यमाचे प्रवेश

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक
दिनांकवेळप्रवेशप्रक्रिया
९ ते १८ जूनसांय. ५ वाजेपर्यंतआॅनलाईन प्रवेश अर्ज भरणे (भाग १ - अपूर्ण राहिलेला भाग पूर्ण भरणे व भरलेला नसल्यास भाग १ सह भाग २ भरणे) तसेच यापूर्वी भरलेल्या आॅनलाईन प्रवेश अर्जातील आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांमार्फत आॅनलाईन दुरुस्ती.
१५ ते १८ जून सायं. ५ वाजेपर्यंतउच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील इन हाऊस कोटा, अल्पसंख्याक कोटा प्रवेशप्रक्रिया करणे व भरलेल्या जागा आॅनलाईन पद्धतीने संगणकीय एजन्सीला कळविणे.
२४ जूनसायं. ५ पहिली गुणवत्ता यादी जाहीर करणे.
२५ ते २७ जूनस. १० ते दु. ४प्रथम गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.
२७ जूनसायं. ५.३० वाजेपर्यंतउच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील इन हाऊस कोटा, व्यवस्थापन कोट्यातील रिक्त जागा गुणवत्ता यादी-२ साठी आॅनलाईन पद्धतीने संगणकीय एजन्सीला कळविणे.
२ जुलैस. ११ दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करणे.
२ ते ४ जुलैस. ११ ते दु. ४दुसऱ्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.
४ जुलैसायं. ५.३० वाजेपर्यंतउच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील इनहाऊस कोटा, व्यवस्थापन कोटा व अल्पसंख्याक कोट्यातील रिक्त जागा गुणवत्ता यादी-३ साठी आॅनलाईन पद्धतीने संगणकीय एजन्सीला कळविणे.
९ जुलैस. ११तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करणे.
९ व १० जुलैस. ११ ते दु. ४तिसऱ्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.
११ ते १४ जुलैस. १० ते दु. ४प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे पूर्ण शुल्क भरून त्यांचे प्रवेश निश्चित करणे.
१५ जुलै इयत्ता अकरावीसाठीचे प्रत्यक्ष अध्यापनाचे काम सुरू करणे.

 

प्रवेशप्रक्रियेतील ऑनलाईन अर्ज भरण्याचे पहिले दोन टप्पे पूर्ण  केल्यानंतर तिस:या टप्प्यात प्रत्यक्ष प्रवेशास सुरुवात होईल.
 
> पहिली गुणवत्ता यादी जाहीर करणो 
> ज्या महाविद्यालयासाठी आपले नाव गुणवत्ता यादीत आले असेल, त्या महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित करा.
> प्रवेश निश्चित करताना केवळ 5क् रुपये शुल्क भरावे लागेल.
4 पहिल्यांदा प्रवेश निश्चित केल्यानंतर आपल्याला पुढील फेरीतील गुणवत्ता यादीमध्ये एक बेटरमेंटची संधी उपलब्ध होते का, हे तपासण्यात येईल.
> जर आपले नाव कुठल्याच महाविद्यालयासाठी पहिल्या गुणवत्ता यादीत आले नसेल, तर पुढच्या गुणवत्ता यादीची वाट पाहा.
> जर एखाद्या महाविद्यालयासाठी आपले नाव गुणवत्ता यादीत आले असेल आणि तरीसुद्धा आपण त्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला नाही, तर ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडावे लागेल.
 
दुसरी व तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होईल.
- पुढील बेटरमेंट फे:यांमध्ये आपल्याला आपल्या पसंतीक्रमानुसार वरील महाविद्यालय उपलब्ध झाल्यास आधी प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयातून आपला प्रवेश रद्द करून नवीन महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित करावा.

Web Title: Announce the eleventh admission schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.