प्रथम येणा-या प्रथम संधी फेरीचे वेळापत्रक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:23 AM2021-01-13T04:23:47+5:302021-01-13T04:23:47+5:30
पुणे: राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावीच्या प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य फेरीचे (एफसीएफएस)वेळापत्रक प्रसिध्द केले असून विद्यार्थ्यांना येत्या ...
पुणे: राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावीच्या प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य फेरीचे (एफसीएफएस)वेळापत्रक प्रसिध्द केले असून विद्यार्थ्यांना येत्या १३ ते ३१ जानेवारी या कालावधीत विद्यार्थ्यांना अकरावीच्या रिक्त असलेल्या जागांवर प्रवेश दिला देण्यात येणार आहे.या फेरीसाठी पुरवणी फेरीतील उत्तीर्ण व एटीकेटी मिळालेले विद्यार्थी पात्र ठरणार आहेत.
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातून विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार व त्यांच्या पसंतीनुसार महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला. मात्र,आता उर्वरित जागांसाठी प्रथम येणा-यास प्रथम संधी फेरी राबविली जाणार आहे.या फेरीसाठी ४५० ते ५०० गुणांक असलेल्या विद्यार्थ्यांचा पहिला संवर्ग,४०० ते ५०० गुणांकाचा दुसरा संवर्ग, ३५० ते ५०० गुणांक असलेला तिसरा संवर्ग, ३०० ते ५०० गुणांकाचा चौथा संवर्ग, २५० ते ५०० गुणांक असलेला पाचवा संवर्ग असणार आहे. तसेच सहाव्या संवर्गात दहावीत इत्तीर्ण असणारे सर्व विद्यार्थी आणि सातव्या संवर्गात एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश केला आहे. या सातही संवर्गासाठी स्वतंत्र फे-या घेतल्या जाणार आहेत. प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------
एफसीएफएस फेरीसाठी पात्र असणारे विद्यार्थी
1) प्रवेश अर्ज भाग -१ भरून प्रमाणित केलेले सर्व विद्यार्थी
2) यापूवी प्रवेश फेरीमध्ये ओरवेश न मिळालेले विद्यार्थी
3) मिळालेला प्रवेश रद्द केले आहेत किंवा ज्यांना प्रवेश नाकारला असे विद्यार्थी
4) यापूर्वी किंवा डिसेंबरमधील पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी
5) एटीकेटी मिळालेली विद्यार्थी
--------------------
विद्यार्थी केव्हा करू शकतील प्रवेश निश्चित
- पहिल्या संवर्गातील विद्यार्थी १३ ते १५जानेवारीपर्यंत
- दुस-या संवर्गातील विद्यार्थी १६ ते १८ जानेवारीपर्यंत
- तिस-यासंवर्गातील विद्यार्थी १९ ते २० जानेवारीपर्यंत
- चौथ्या संवर्गातील विद्यार्थी २१ते २२ जानेवारीपर्यंत
- पाचव्या संवर्गातील विद्यार्थी २३ ते २५ जानेवारीपर्यंत
- सहाव्या संवर्गातील विद्यार्थी २७ ते २८ जानेवारीपर्यंत
- सातव्या संवर्गातील विद्यार्थी २९ ते ३१ जानेवारीपर्यंत
---------