इनामदार हॉस्पिटलची सद्य:स्थिती जाहीर करा

By admin | Published: December 9, 2014 12:27 AM2014-12-09T00:27:09+5:302014-12-09T00:27:09+5:30

महापालिकेची परवानगी न घेता बेकायदा बांधकाम करणा:या वानवडी येथील इनामदार हॉस्पिटलची सद्य:स्थिती महापालिकेच्या संकेतस्थळावर तातडीने जाहीर करावी,

Announce the status of Inamdar Hospital | इनामदार हॉस्पिटलची सद्य:स्थिती जाहीर करा

इनामदार हॉस्पिटलची सद्य:स्थिती जाहीर करा

Next
पुणो : महापालिकेची परवानगी न घेता बेकायदा बांधकाम करणा:या वानवडी येथील इनामदार हॉस्पिटलची सद्य:स्थिती महापालिकेच्या संकेतस्थळावर तातडीने जाहीर करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे. त्याबाबतचे पत्र मंचाने राज्याच्या माहिती आयुक्तांना दिले असून, माहिती अधिकाराच्या कक्षेत ही माहिती येत असल्याने त्याबाबतचे आदेश पालिका आयुक्तांना द्यावेत, अशी मागणी सजग नागरिक मंचाने  माहिती आयुक्तांकडे केली आहे.
वानवडी येथील इनामदार हॉस्पिटलने पालिकेकडून सहा मजल्यांची परवानगी घेऊन बारा मजले बांधल्याचा प्रकार पाच महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. पालिकेकडून आर 7 अंतर्गत हे हॉस्पिटल बांधण्यात आले आहे. हॉस्पिटलच्या प्रशासनाबरोबर महापालिकेने करारनामा करून हॉस्पिटलचे काही मजले पालिकेला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रत्यक्षात आजपयर्ंत हॉस्पिटलच्या प्रशासनाने कोणतीही जागा पालिकेला हस्तांतरित केलेली नाही. हॉस्पिटलसाठी सहा मजल्यांची मान्यता पालिकेने दिलेली असतानाही तब्बल 12 मजली हॉस्पिटल येथे बांधण्यात आले आहे. या  बेकायदा बांधकामावर कारवाई करू नये, यासाठी हॉस्पिटलने हायकोर्टात धाव घेऊन स्थगिती घेतली आहे. याची सद्य:स्थिती नक्की काय आहे? आर 7 अंतर्गत जागा ताब्यात घेण्यावर कोटार्ने स्थगिती दिलेली आहे का? हॉस्पिटलकडून जागा ताब्यात न घेता पालिकेतील अधिका:यांनी भोगवटपत्र कसे दिले? या दोषी अधिका:यांवर आयुक्तांनी कोणती कारवाई केली? याची माहिती पालिकेच्या वेबसाईटवर माहिती अधिकार कायद्यानुसार देणो गरजेचे असते. 15 दिवसांपासून ही माहिती जाहीर करावी, अशी मागणी पालिका आयुक्तांकडे करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, विश्वास सहस्रबुद्धे यांनी पत्रकार परिषदेत केला. (प्रतिनिधी)

 

Web Title: Announce the status of Inamdar Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.