कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 02:31 AM2018-06-11T02:31:18+5:302018-06-11T02:31:18+5:30
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ११ जूनपासून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहे. प्रवेश अर्ज करण्यासाठी ५ जुलै ही शेवटची मुदत आहे.
पुणे - राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ११ जूनपासून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहे. प्रवेश अर्ज करण्यासाठी ५ जुलै ही शेवटची मुदत आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत आॅनलाईन प्रवेशाची प्रक्रिया पार पडणार आहे.
बीएस्सी कृषी, बीएस्सी उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, बीएस्सी आॅनर्स, सामाजिक विज्ञान या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावी विज्ञानमधील टक्केवारीच्या ३० टक्के गुण आणि एमएचटी-सीईटीच्या संबंधित गटातील गुणांच्या टक्केवारीच्या ७० टक्के गुण असे मिळून उमेदवारांची गुणवत्ता यादी निश्चित केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्जात वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती व महाविद्यालयाचे विकल्प भरून संबंधित मूळ कागदपत्रे स्कॅन करून संकेतस्थळावर अपलोड करावयाची आहेत. आॅनलाईन प्रवेशाच्या एकूण ४ फेऱ्या राबविल्या जातील. उमेदवारांनी जास्तीत जास्त महाविद्यालयांचे विकल्प भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, कृषी विद्यापीठ
अंतर्गत बी. एफ. एस्सी मत्स्यशास्त्र, बीएएस्सी पशुसंवर्धन, कृषी
व्यवसाय व्यवस्थापन या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रवेश वेळापत्रक
आॅनलाईन अर्जास सुरुवात ११ जूनपासून
अर्जासाठी अंतिम मुदत ५ जुलै
तात्पुरती गुणवत्ता यादी १३ जुलै
अंतिम गुणवत्ता यादी २३ जुलै
पहिल्या प्रवेश फेरीची यादी २६ जुलै
दुसºया प्रवेश फेरीची यादी ३ आॅगस्ट
तिसरी प्रवेश फेरी ९ आॅगस्ट
चौथी प्रवेश फेरी १६ आॅगस्ट