पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीतील संघांची घोषणा, १९ संघ करणार सादरीकरण

By श्रीकिशन काळे | Published: December 2, 2023 05:47 PM2023-12-02T17:47:27+5:302023-12-02T17:48:01+5:30

पुण्यासह कोल्हापूर, रत्नागिरी, संभाजीनगर आणि अमरावती विभागातील एकूण १९ संघांचे सादरीकरण होणार आहे....

Announcement of Teams in Purushottam Karandak Grand Final | पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीतील संघांची घोषणा, १९ संघ करणार सादरीकरण

पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीतील संघांची घोषणा, १९ संघ करणार सादरीकरण

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीतील संघांची घोषणा करण्यात आली असून महाअंतिम फेरी २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत पुण्यात रंगणार आहे. पुण्यासह कोल्हापूर, रत्नागिरी, संभाजीनगर आणि अमरावती विभागातील एकूण १९ संघांचे सादरीकरण होणार आहे.

स्पर्धेची महाअंतिम फेरी भरत नाट्य मंदिरात होणार आहे. २७ ते २८ डिसेंबरदरम्यान सकाळी ९ ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत आणि २९ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ अशा पाच सत्रात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २९ रोजी सायंकाळी ५ वाजता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या हस्ते होणार आहे.

महाअंतिम फेरीतील संघ पुढीलप्रमाणे : पुणे विभाग : टिळक आयुर्वेद महाविद्यालय (पिक्सल्स), सर परशुरामभाऊ महाविद्यालय (कृष्णपक्ष), मराठवाडा विधी महाविद्यालय (रवायत ए विरासत), मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड (फेलसेफ).

कोल्हापूर विभाग : देशभक्त रत्नाप्पा कुंभार वाणिज्य महाविद्यालय (असणं नसणं), प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर (पाहिजे म्हणजे पाहिजे), महावीर महाविद्यालय (निर्झर), शहाजी लॉ कॉलेज (जंगल जंगल बटा चला है).

रत्नागिरी विभाग : डी. बी. जे. महाविद्यालय (हॅपी फादर्स डे), फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय (बोबड्या), स. ह. केळकर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय (वन पीस).

संभाजीनगर विभाग : देवगीरी महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग (खळगं खळगं), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (चुकलं तर माफ करा), डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग (अल्प भूधारक), प्रताप महाविद्यालय (तो पाऊस आणि टाफेटा).

अमरावती विभाग : प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड रिसर्च (साकव), वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था (समांतर), सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय (रात्र अंधार), डॉ. विठ्ठलराव खोब्रागडे कला व वाणिज्य महाविद्यालय (न्यायालयात जाणारा प्राणी).

महाअंतिम फेरीत पहिल्यांदाच दाखल झालेले संघ

महावीर महाविद्यालय, कोल्हापूर (निर्झर), शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर (जंगल जंगल बटश चला है), मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे (रवायत ए विरासत), मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड (फेलसेफ), प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर (पाहिजे म्हणजे पाहिजे), टिळक आयुर्वेद महाविद्यालय, पुणे (पिक्सल्स), सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावती (रात्र अंधार).

Web Title: Announcement of Teams in Purushottam Karandak Grand Final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.