पुणे विमानतळ जागेची योग्य वेळी घोषणा

By admin | Published: May 14, 2016 02:10 AM2016-05-14T02:10:58+5:302016-05-14T02:10:58+5:30

पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रश्नाबाबत आम्ही बरेच पुढे गेलो आहोत. जागा जाहीर केल्यानंतर काय गोंधळ सुरु होतो हे माहिती आहे, म्हणून जागेबाबत योग्य वेळी घोषणा क

Announcement at the right time of Pune Airport space | पुणे विमानतळ जागेची योग्य वेळी घोषणा

पुणे विमानतळ जागेची योग्य वेळी घोषणा

Next

पुणे : पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रश्नाबाबत आम्ही बरेच पुढे गेलो आहोत. जागा जाहीर केल्यानंतर काय गोंधळ सुरु होतो हे माहिती आहे, म्हणून जागेबाबत योग्य वेळी घोषणा करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले. दरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमानतळ जिल्ह्यात कोठेही करा, पण लवकर करा, अशी विनंती मुख्यमंत्र्याकडे केली.
पुणे जिल्ह्यात येऊ घातलेल्या फॉक्सकॉनसारख्या परदेशी कंपन्यांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज वाढली होती. त्यात दोन महिन्यांपूर्वी मुबंई येथे झालेल्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात सर्वच उद्योजकांनी पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळासाठीची जागा निश्चित झाली असून, याबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाला जिल्ह्यातील कोये-पाईट, शिरोली-चांदूस, जेजुरी आणि चौफुला या चार जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आले होते. सर्व बाबीची तांत्रिक तपासणी एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया आणि हवाई दलाच्या उच्चपदस्थांनी पाहणी करून तांत्रिक अहवाल सादर केला आहे.

Web Title: Announcement at the right time of Pune Airport space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.