दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:13 AM2021-09-21T04:13:50+5:302021-09-21T04:13:50+5:30

ऑनलाईन झालेल्या या कार्यक्रमात स्पर्धेतील विजेत्यांच्या नावांची घोषणा युवा लेखक-दिग्दर्शक-अभिनेता विराजस कुलकर्णी याने केली. बालकलाकार शर्व दाते आणि श्रीनिवास ...

Announcement of winners of Divakar Smriti Natyachata competition | दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा

दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा

googlenewsNext

ऑनलाईन झालेल्या या कार्यक्रमात स्पर्धेतील विजेत्यांच्या नावांची घोषणा युवा लेखक-दिग्दर्शक-अभिनेता विराजस कुलकर्णी याने केली. बालकलाकार शर्व दाते आणि श्रीनिवास ढवळे कार्यक्रमात सहभागी झाले होते. सुरुवातीस नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या उपक्रमांची तसेच स्पर्धेविषयी माहिती दिली.

दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेतील सहभागाविषयीच्या आठवणींना उजाळा देऊन विराजस म्हणाला, नाट्यछटेद्वारे विविध पात्रे उभी करण्याचा सर्वांगीण अनुभव मिळतो. छंदाकडे सकारात्मकतेने बघा, नियमित तालिम करा असा सल्ला त्याने बालकलाकारांना दिला. कलेच्या क्षेत्रात विविध पर्याय खुले झाले असले, तरी नाट्यक्षेत्रातील आनंद निराळा असल्याचे विराजसने आवर्जून सांगितले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल

गट १ - शिशू गट : प्रथम- शिवांश मोरे, द्वितीय राजवीका फाळे, तृतीय अद्विका राऊत, उत्तेजनार्थ क्षिप्रा जोशी, पूर्वा अहेर.

गट २ - पहिली-दुसरी : प्रथम- नंदिनी यावलकर, द्वितीय अन्वित हर्डीकर, तृतीय मनस्वी देशपांडे. उत्तेजनार्थ प्रणव कडू, प्रार्थना मोरे, स्वरा सांगळे.

गट ३ - तिसरी-चौथी : प्रथम- निहारा डिकोंडा, द्वितीय शारिनी सेवलकर, तृतीय सई कुलकर्णी. उत्तेजनार्थ आत्मज साकुडे, आरोही देशपांडे.

गट ४ - पाचवी-सातवी : प्रथम- सई भोसले, द्वितीय सावनी दात्ये, तृतीय ईश्वरी निकम. उत्तेजनार्थ तक्षील अभ्यंकर, सान्वी भाके, सोहा धर्माधिकारी.

गट ५ - आठवी-दहावी : प्रथम- यक्षाली जोशी, द्वितीय अथर्व खोडके, तृतीय रुचा जाधव.

गट ६ - अकरावी-वय वर्षे ६०-खुला : प्रथम- रणजीत मोहिते, द्वितीय माधवी जोगळेकर, तृतीय स्वाती वर्तक. उत्तेजनार्थ समीरा जोशी, सौरभ नावरे, पराग कुलकर्णी.

गट ७ - ६० वर्षांवरील ज्येष्ठ : प्रथम- नलिनी भोसेकर, द्वितीय संजीवनी फडके, तृतीय शोभा पोकळे. उत्तेजनार्थ निलिमा मराठे.

Web Title: Announcement of winners of Divakar Smriti Natyachata competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.