विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ अध्यक्षांच्या निवडी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 08:37 PM2018-09-18T20:37:09+5:302018-09-18T20:47:31+5:30
अभ्यास मंडळ सदस्य पदासाठी जानेवारी २०१८ मध्ये निवडणूक पार पडून सदस्य निवडून आले. मात्र, कुलगुरू नियुक्त सदस्यांच्या नियुक्त्या होण्यास ८ महिन्यांचा विलंब लागल्याने अध्यक्षांची निवड होऊ शकलेली नव्हती.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्याशाखेच्या मराठी, संस्कृत, इतिहास, संरक्षण व सामाजिकशास्त्र, विधी आणि समाजशास्त्र अभ्यासमंडळाच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली. तर हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र व लोकप्रशासन अभ्यास मंडळावर निवडणूक होउन अध्यक्ष निवडून आले.
अभ्यास मंडळ सदस्य पदासाठी जानेवारी २०१८ मध्ये निवडणूक पार पडून सदस्य निवडून आले. मात्र, कुलगुरू नियुक्त सदस्यांच्या नियुक्त्या होण्यास ८ महिन्यांचा विलंब लागल्याने अध्यक्षांची निवड होऊ शकलेली नव्हती. त्याचबरोबर अभ्यास मंडळाच्या काही सदस्यांच्या नियुक्त्या नियमबाह्य पध्दतीने करण्यात आल्याने फेरयादी लावावी लागण्याची नामुष्की विद्यापीठ प्रशासनावर आली. तसेच हा नियुक्त्यांचा वाद न्यायालयात गेला आहे. यापार्श्वभुमीवर मानव विज्ञान विद्याशाखा विषयांच्या अभ्यास मंडळ निवडणुका मंगळवारी पार पडल्या.
हिंदी अभ्यास मंडळावर विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रा. डॉ. सदानंद भोसले, इंग्रजी अभ्यास मंडळावर एस. पी. महाविद्यालयाचे डॉ. अशोक चासकर, अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर डॉ. मंजुश्री बोबडे, मानसशास्त्र अभ्यासमंडळावर डॉ. नरेंद्र देशमुख आणि राज्यशास्त्र व लोकप्रशासन अभ्यास मंडळावर डॉ. बाळकृष्ण कांबळे अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले.
मराठी विषयाच्या अभ्यास मंडळावर मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता कॉलेजचे प्रा. डॉ. शिरीष लांडगे पाटील, संस्कृत अभ्यास मंडळावर विद्यापीठाच्या संस्कृत प्रगत अध्ययन केंद्राचे प्रा. रविंद्र मुळे, इतिहास अभ्यास मंडळावर विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रा. राधिका शेषन, संरक्षण व सामारिकशास्त्र अभ्यासमंडळावर विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिक शास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. विजय खरे, विधी अभ्यासमंडळावर यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेजचे प्रा. डॉ. सोपान इवरे आणि समाजशास्त्र अभ्यास मंडळावर विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. श्रुती तांबे यांची बिनविरोध निवड झाली आहे.