आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2016 12:48 AM2016-02-29T00:48:27+5:302016-02-29T00:48:27+5:30

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत येत्या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशाला अखेर मुहूर्त लागला, तरी प्रत्यक्षात प्रवेशास एप्रिल महिनाच उजाडणार असल्याने आरटीईच्या

Announcing the schedule of RTE admission | आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

Next

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत येत्या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशाला अखेर मुहूर्त लागला, तरी प्रत्यक्षात प्रवेशास एप्रिल महिनाच उजाडणार असल्याने आरटीईच्या प्रवेशात पुन्हा गोंधळ होणार का, अशी शंका उपस्थित
होत आहे.
डिसेंबर २०१५ पासून आरटीई प्रवेशप्रक्रियेबाबत विविध तर्क लढविण्यात येत होते. ही प्रक्रिया जानेवारीमध्ये सुरू होण्याची अपेक्षा होती; मात्र शासनाकडून शिक्षण विभागाच्या प्रवेशाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यास दिरंगाई झाल्याने आता मार्चमध्ये प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पुढील महिनाभराच्या काळात शाळा नोंदणी, पालकांनी करावयाचे अर्ज आणि सोडत पद्धतीने प्रवेश हे करावे लागणार आहे. त्यामुळे संभाव्य गोंधळावर मात करण्यासाठी यंदा प्रथमच स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
नाशिक विभागात शाळा नोंदणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, प्रवेशप्रक्रिया सुलभ आणि गोंधळ न करता केली जावी व सर्व वॉर्ड पातळीवर सक्षम सहायक अधिकारी कक्ष नेमून पालकांना आॅनलाइन प्रक्रिया साह्य करावे. शाळांचे रजिस्ट्रेशन करून आरटीईअंतर्गत प्रवेश न देणाऱ्या शाळांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी प्रशासनाने करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Announcing the schedule of RTE admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.