संतापजनक! राजगुरुनगर येथे झाडांची छाटणी बेतली पक्षांच्या मुळावर; ७० ते ८० पक्षांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 06:19 PM2020-07-18T18:19:55+5:302020-07-18T18:22:15+5:30

या घटनेबाबत प्राणीमित्रांनी संताप व्यक्त

Annoying! Death of 70 to 80 birds between cutting of trees at Rajgurunagar | संतापजनक! राजगुरुनगर येथे झाडांची छाटणी बेतली पक्षांच्या मुळावर; ७० ते ८० पक्षांचा मृत्यू

संतापजनक! राजगुरुनगर येथे झाडांची छाटणी बेतली पक्षांच्या मुळावर; ७० ते ८० पक्षांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देराजगुरूनगर येथील तहसीलदार कचेरी येथे वडाचे झाड व पोस्ट ऑफिसजवळ अशोकाची झाडे

राजगुरूनगर:  झाडांची छाटणी पक्ष्याच्या मुळावर बेतली असुन ७० ते ८० पानकावळे, व बगळ्याची पिल्ले मूत्यूमुखी पडले आहे. तहसिलदार कचेरी, पोस्ट ऑफिस येथील झाडांची छाटणी केल्यामुळे पक्ष्यांची घरटी जमिनीवर पडून लहान पिल्ले जखमी होऊन मृत्यू पावले असल्याची घटना राजगुरूनगरमध्ये घडली आहे. या घटनेबाबत प्राणीमित्रांनी संताप व्यक्त केला आहे.

राजगुरूनगर येथील तहसीलदार कचेरी येथे वडाचे झाड व पोस्ट ऑफिसजवळ अशोकाची झाडे आहे. या झाडांची उंची वाढली आहे. तसेच या ठिकाणी पक्षांचा सहवास असल्याने त्यांची विष्ठा पडते. त्याची दुर्गंधी पसरत असल्याने या झाडांची छाटणी करण्यात आली. या छाटणीत अनेक पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त झाली. पानकावळे व बगळ्यांची यांची सुमारे ७० ते ८० लहान पिल्ले जमिनीवर पडून मृत्युमुखी पडली.

दरम्यान, राजगुरुनगर येथील रेस्क्यू टीम मधील सदस्यांनी पुण्यामधील वाईल्डलाईफ रेस्क्यू टीम सोबत संपर्क साधत या घटनेची माहिती दिली. एक तासातच पुण्यातील टीम त्यांची गाडी घेऊन डॉक्टरांसोबत घटनास्थळी पोहचली. त्यांना सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बगळा आणि पानकावळा यांची जवळपास १०३ पिल्ले सापडली. ती सर्व जमिनीवर इकडे तिकडे झाडांच्या फांद्या खाली अडकली होती. आणि मेलेली पिल्ले पण जवळपास ७० ते ८० होती.

जिवंत असणाऱ्या सर्व पिल्लांना डॉक्टरांनी लसीकरण केले. व सर्व पिल्ले ताब्यात घेतली. यावेळी चेतन गावडे,नागेश थिगळे, निलेश वाघमारे, महेश यादव, सागर कोहिनकर, प्रिया गायकवाड, ब्रिजेश गायकवाड, जीवन इंगळे ,या राजगुरुनगर शहरातील प्राणी मित्रांनी जखमी पिल्ले गोळा करण्यास मदत केली. बगळा व पानकावळा अशा १०३ जिवंत पिल्लांना जीवनदान देत ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.

Web Title: Annoying! Death of 70 to 80 birds between cutting of trees at Rajgurunagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.