पूना ऑप्थलमॉलॉजिकल सोसायटीतर्फे वार्षिक परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:12 AM2021-03-18T04:12:10+5:302021-03-18T04:12:10+5:30
हा कार्यक्रम भारतातील व जगभरातील सर्व नेत्रतज्ज्ञांसाठी असणार आहे. याकरिता कुठलीही नोंदणी शुल्क आकारलेले नाही. परिषदेच्या आयोजक चेअरमन डॉ. ...
हा कार्यक्रम भारतातील व जगभरातील सर्व नेत्रतज्ज्ञांसाठी असणार आहे. याकरिता कुठलीही नोंदणी शुल्क आकारलेले नाही. परिषदेच्या आयोजक चेअरमन डॉ. गीतांजली शर्मा, सचिव डॉ. मुकेश पर्यानी व खजिनदार डॉ. काबरा असतील. या परिषदेत जगभरातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. मायकल बर्डन, रॉयल कॉलेज युकेचे माजी अध्यक्ष प्रा. मीनास थिओडोर, ऑस्ट्रेलिया, डॉ. अर्चना पिंपळनेरकर-कुलकर्णी, पेडियाट्रिक आय सर्जन युके, प्रा. ची सून फाईक सिंगापूर, डॉ निल ब्रेस्लर यूएसए हे आपले संशोधन सादर करतील.
परिषदेत डॉ. रमण गंगाखेडकर यांचे ‘कोरोना व्हायरसचे वर्ष-एक आढावा’ या विषयावरील व्याख्यान असेल. नेत्रविज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांना पीओएस लाइफ टाईम अवॉर्डिव्ह अवॉर्ड, दिवंगत डॉ. नंदकुमार शहा यांच्या स्मृतीस विशेष वक्तृत्व पुरस्कार, दिवंगत डॉ. आशा केळकर पुरस्कार आणि श्रीमती शुभदा कुलकर्णी स्मृती पुरस्कार असे पुरस्कार देणार आहेत. याशिवाय नेत्रविज्ञान क्षेत्रातील महिला, डिफर्ड सर्जरी लाईव्ह व्हिडिओ, मोतीबिंदूवर सत्र, ग्लुकोमा सत्र, मुलांमधील डोळ्यांच्या समस्या तसेच कौशल्य हस्तांतरण कार्यशाळा यांचे देखील आयोजन या परिषदेत केले आहे.