घोडगंगा साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:12 AM2021-03-27T04:12:42+5:302021-03-27T04:12:42+5:30
न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर ...
न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर आॅनलाईन पध्दतीने कारखान्याचे अध्यक्ष, आमदार अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या सुरूवातीला कारखान्याचे उपाध्यक्ष अॅड. रंगनाथ थोरात यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले. त्यानंतर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक संभाजीराव पाटील व अहवाल वर्षात दिवंगत झालेल्यांना व्यक्तींंना श्रध्दांजली वाहण्यात आली. कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांनी मागील सभेचे इतिवृत्त व विषयपत्रिकेचे वाचन करून सभेच्या कामकाजाला सुरुवात केली.
या वेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र काळे, कमलाकर साठे ,पोपट चव्हाण, लक्ष्मण कळसकर, मधुकर दोरगे, गोविंदराव कळसकर, बाळासाहेब गवारी, दत्तात्रय जाधव, विष्णू वाबळे आदी सभासद चर्चेमध्ये सहभागी झाले होते. दरम्यान, या वेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार अशोक पवार यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. याप्रसंगी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे, प्रा. सुभाष कळसकर, राजेंद्र गावडे , संतोष रणदिवे, जगन्नाथ जगताप, अर्जुनराव कोंडे, सुदामराव साठे, प्रशांत होळकर, प्राचार्य डॉ. गोविंद राजेनिंबाळकर, बाळासाहेब ढमढेरे, सचिन मचाले, वाल्मिकराव नागवडे, उत्तम सोनवणे, पोपटराव भुजबळ, बिरा शेंडगे, दिलीपराव मोकाशी, शंकरराव फराटे शालनताई काळे, मनीषा सोनवणे, आदी मान्यवर उपस्थित होते.कारखान्याचे जेष्ठ संचालक बाबासाहेब फराटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शेवटी सामूहिक राष्ट्रगीत गायनाने सभेची सांगता झाली.
बातमीला फोटो आहे
--
फोटो २६न्हावरे कारखाना
फोटो : न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत बोलताना कारखान्याचे अध्यक्ष आमदार अशोक पवार