खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची वार्षिक सभा खेळीमेळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:17 AM2021-03-13T04:17:17+5:302021-03-13T04:17:17+5:30

संस्थेच्या वार्षिक अहवालाचे व मागील विशेष सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताचे वाचन उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर यांनी केले. उपस्थित सभासदांनी त्यास एकमताने ...

Annual meeting of Khed Taluka Shikshan Prasarak Mandal | खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची वार्षिक सभा खेळीमेळीत

खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची वार्षिक सभा खेळीमेळीत

googlenewsNext

संस्थेच्या वार्षिक अहवालाचे व मागील विशेष सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताचे वाचन उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर यांनी केले. उपस्थित सभासदांनी त्यास एकमताने मंजुरी दिली.

काळानुरूप संस्थेच्या ध्येयधोरणात बदल करणे गरजेचे असल्याने काही मुद्यांच्या बाबतीत घटनादुरुस्ती करण्याचा निर्णय मागील विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता, त्यासही सभासदांनी एकमताने पाठिंबा दिला. विषयपत्रिकेनुसार झालेल्या चर्चेत हरिभाऊशेठ सांडभोर, हिरामण सातकर, सतीश नाईकरे, काळूराम कड आदि सभासदांनी सहभाग घेतला.

संस्थेने नवीन सुरू केलेल्या साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयासाठी दळणवळाची सहजता आणि विद्यार्थिनींची सुरक्षितता लक्षात घेऊन राजगुरूनगरपासून जवळपास असलेली महामार्गनजीक अशी योग्य जागा शोधण्यासाठी संस्थेच्या सभासदांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी केले.

संस्थेचे संभासद असलेले विनायक घुमटकर यांची खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी निवड झाल्याबद्दल तसेच दत्तात्रेय ढोरे यांची भांबुरवाडीचे सरपंच म्हणून आणि शांताराम मेदनकर यांची सतत ३० वर्षे मेदनकरवाडी ग्रामपंचायतीत निवडून आल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.

Web Title: Annual meeting of Khed Taluka Shikshan Prasarak Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.