पारगाव सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:07 AM2021-03-30T04:07:02+5:302021-03-30T04:07:02+5:30
सभेतील चर्चेत पोपटराव ताकवणे, सुभाष बोत्रे, मच्छिंद्र ताकवणे, सोमनाथ ताकवणे, रामदास ताकवणे, संतोष ताकवणे, शांताराम बोत्रे, आत्माराम बोत्रे यांनी ...
सभेतील चर्चेत पोपटराव ताकवणे, सुभाष बोत्रे, मच्छिंद्र ताकवणे, सोमनाथ ताकवणे, रामदास ताकवणे, संतोष ताकवणे, शांताराम बोत्रे, आत्माराम बोत्रे यांनी प्रश्न विचारले. तर त्या प्रश्नांना दौंड पंचायत समितीचे उपसभापती व संस्थेचे संचालक सयाजी ताकवणे, चेअरमन ज्ञानदेव बोत्रे, संचालक मल्हारी बोत्रे व सचिव दत्तात्रय शितोळे यांनी उत्तरे दिली.
संस्थेने खरेदी केलेल्या जागेत पारगाव व परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारा महत्त्वाकांक्षी कृषी पायाभूत निधी व नाबार्डच्या पॅकअॅज एमएससी योजनेअंतर्गत ग्रिडिंग प्रकल्प उभारण्यास व त्यासाठी गोडाऊन बांधण्यास व त्यासाठी सदर योजनेअंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सह. बॅंकेकडून अर्थसहाय्य घेण्यास सभेने सर्वानुमते मंजुरी दिली.
यावेळी दौंडचे सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे यांनी सभेला ऑनलाइन उपस्थित रहात सभासद व संचालक यांना मार्गदर्शन केले.
यावेळी उपसभापती व संस्थेचे संचालक सयाजी ताकवणे यांनी संस्थेच्या कामाचा आढावा घेतला. आजअखेर बॅंकपातळीवर वसुली ९० टक्के असून ३१ मार्चअखेर १०० टक्के वसुली होईल. त्यासाठी सभासदांनी सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे सचिव दत्तात्रय शितोळे यांनी केले.