शिरुर खरदी विक्री संघाची वार्षिक सभा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:12 AM2021-03-31T04:12:08+5:302021-03-31T04:12:08+5:30
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती, आवारातील शिरूर तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या कार्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतअध्यक्षस्थानी ...
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती, आवारातील शिरूर तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या कार्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतअध्यक्षस्थानी सभापती राजेंद्र नरवडे यासह संचालक शरद कालेवार, संभाजी भुजबळ, शहाजी ढमढेरे, सचिव रावसाहेब संकपाळ, लिपीक अनिल वर्पे आदी उपस्थित होते.
या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला संस्थेचे दिवंगत संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार रावसाहेब दादा पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुष्पहार घालून उपस्थितांनी अभिवादन केले. कोरोणा संसर्गजन्य रोगाचे पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे उपस्थितांनी पालन करून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग पद्धतीने ही सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी संचालक, सभासदांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे चर्चा करण्यात आली .
संस्थेच्या कामकाजाबद्दल माहिती देताना संस्थेचे सभापती राजेंद्र नरवडे म्हणाले की, तालुका खरेदी-विक्री संघाचे उत्पादनवाढीच्या दृष्टिकोनातून संस्थेच्या कार्यालयाचे समोरील जागेत नवीन इमारतींचे बांधकाम चालू असून यातून संस्थेला मोठे उत्पन्न मिळणार आहे. तसेच संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना ना नफा ना तोटा या तत्त्वावर खत विक्री केली जात आहे.
याकामी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली
सर्व संचालक सहकारी काम करत असून याकामी सर्व सभासदांचे बहुमोल सहकार्य मिळत आहे. यावेळी संस्थेचे सचिव रावसाहेब संकपाळ यांनी विषय पत्रिका वाचून दाखवली. संस्थेस सहकार्य करणाऱ्या सर्व संचालक सभासदांचे आभार माजी सभापती व संचालक शरद कालेवार
यांनी आभार मानले .
---
फोटो क्रमांक - ३०शिरुर खरेदी विक्री संघ
फोटो : ।शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार रावसाहेब दादा पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुष्पहार घालूनअभिवादन करताना सभापती राजेंद्र नरवडे, माजी सभापती, संचालक शरद कालेवार संभाजी भुजबळ