अजून १०२ कारखाने एफआरपीचे थकबाकीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:11 AM2021-03-20T04:11:59+5:302021-03-20T04:11:59+5:30
पुणे : साखर आयुक्तांनी १३ साखर कारखान्यांवर ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांचे उसाचे बील (एफआरपी) थकवले म्हणून कारवाई केली. मात्र आणखी ...
पुणे : साखर आयुक्तांनी १३ साखर कारखान्यांवर ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांचे उसाचे बील (एफआरपी) थकवले म्हणून कारवाई केली. मात्र आणखी १०२ कारखाने ‘एफआरपी’चे अंशत: थकबाकीदार आहेत. या कारखान्यांना पैसे देण्याची सूचना साखर आयुक्तांनी केली आहे.
यावर्षी राज्यात १८८ कारखान्यांनी गाळप हंगामाचे परवाने घेतले. उस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर झालेल्या करारांप्रमाणे या शेतकऱ्यांना १८ हजार २२१ कोटी ५० लाख रूपये एफआरपीपोटी द्यायचे होते. त्यापैकी ८६ कारखान्यांनी १५ हजार ८५० कोटी रूपये अदा करण्यात आले आहेत.
साखर आयुक्तांनी मध्यंतरी १३ कारखान्यांवर त्यांची एफआरपीची थकबाकी जास्त असल्यामुळे जप्तीची कारवाई केली. तरीही १०२ कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम दिलेली नाही. या कारखान्याची एकत्रीत थकीत रक्कम २ हजार ३८५ कोटी ६ लाख रुपये आहे. ही रक्कम अदा केली जावी यासाठी साखर आयुक्त कार्यालयाकडून पाठपुरावा केला जात आहे.