आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणातील आणखी एक आरोपी पुणे पोलिसांनी केला जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 14:32 IST2022-02-10T14:30:33+5:302022-02-10T14:32:13+5:30
अतुल राख हा अटकेतील आरोपी संजय सानप याचा मेहुणा आहे...

आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणातील आणखी एक आरोपी पुणे पोलिसांनी केला जेरबंद
पुणे: सध्या महाराष्ट्रात आरोग्य भरती पेपर फुटी आणि त्यातील गैरप्रकार हे प्रकरण मोठे गाजत आहे. या गैरव्यवहाराप्रकरणी पुणे पोलिसांनी यापूर्वी अनेक आरोपींना ताब्यात घेतले आहे. आता पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला आणखी एक म्होरक्या पोलिसांच्या हाती लागला आहे. अतुल प्रभाकर राख असे आज अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
अतुल राख हा अटकेतील आरोपी संजय सानप याचा मेहुणा आहे. पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला मुख्य आरोपी जीवन सानप याच्या सर्व अॅक्टीव्हीटी अतुल राख करायचा. आरोपी अतुलला पोलिसांनी पुण्यातूनच जेरबंद केले.
आरोग्य भरतीतील गट ‘क’ आणि गट ‘ड’ या दोन्ही परिक्षांचे पेपर फुटले होते. या दोन्ही पेपरफुटीमध्ये पुणे सायबर पोलीसांना वडझरीचे सानप बंधू हवे आहेत. आतापर्यंत केवळ संजय शाहुराव सानपला पोलीसांनी जेरबंद केले आहे. आता अतुल याची अटक झाल्याने इतर आरोपींचे धाबे दणाणले आहेत. अतुल राख याला आज कोर्टात हजर केले जाणार आहे.