पुणे पोर्शे अपघातप्रकरणी मोठा उलघडा; रक्ताचे नमुने कसे घेतले? धक्कादायक माहिती समोर

By नितीश गोवंडे | Published: May 30, 2024 07:45 PM2024-05-30T19:45:40+5:302024-05-30T19:51:31+5:30

रक्ताचे नमुने घेतलेल्या ठिकाणाचा पंचनामा देखील करण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले...

Another big revelation in the Pune Porsche accident case; How are blood samples taken? information in court | पुणे पोर्शे अपघातप्रकरणी मोठा उलघडा; रक्ताचे नमुने कसे घेतले? धक्कादायक माहिती समोर

पुणे पोर्शे अपघातप्रकरणी मोठा उलघडा; रक्ताचे नमुने कसे घेतले? धक्कादायक माहिती समोर

पुणे : कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन 'बाळा'ला तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने हे सीसीटीव्ही कॅमेरा नसलेल्या ठिकाणी घेण्यात आले आहेत, अशी माहिती या गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. ३०) न्यायालयात दिली. रक्ताचे नमुने घेतलेल्या ठिकाणाचा पंचनामा देखील करण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले.

ज्या ठिकाणी 'बाळा'चे रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहे, त्या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये डॉ. श्रीहरी हाळनोर आणि गटकांबळे यांच्यासह काही साक्षीदार दिसून आले आहेत. डॉ. तावरे, डॉ. हाळनोर आणि घटकांबळे त्यांच्यामध्ये रक्ताचे नमुने घेण्याच्या वेळी विविध माध्यमांमधून संवाद झालेला आहे. तसा सीडीआर देखील जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली.

पाच जूनपर्यंत पोलिस कोठडीत वाढ...

कल्याणी नगर अपघात प्रकरणात कार चालक बाळाला वाचवण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यासह शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलिस कोठीडत न्यायालयाने पाच जूनपर्यंत वाढ केली आहे. या गुन्ह्यात कलमवाढ देखील करण्यात आली आहे.

रक्ताचे नमुने फेकून दिले नाहीत...

'बाळा'ला वाचवण्यासाठी त्याच्या ऐवजी एका महिलेच्या रक्ताचे नमुने घेण्यात आल्याचे या प्रकरणात उघडकीस आले आहे. तर मुलाचे नमुने डॉ. हाळनोर याने कचराकुंडीत फेकून न देता कुणाच्या तरी ताब्यात दिले आहे. हे नमुने नेमके कुणाच्या ताब्यात देण्यात आले याचा पोलिस शोध घेत आहे, असे सरकारी वकील नितीन कोंघे यांनी नमूद केले.

रक्त घेतलेली महिला कोण?

त्या 'बाळा'ला वाचवण्यासाठी ससूनमधील डॉक्टरांनी 'बाळा'ऐवजी एका महिलेच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ही महिला कोण आहे याचा अद्याप तपास लागलेला नाही. आम्ही या महिलेचा तपास करत असल्याची माहिती गुन्ह्याचे तपास अधिकारी असलेले सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयाला दिली.

आणखी संशयितांना होणार अटक...

कल्याणी नगरमधील गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही आत्तापर्यंत अनेकांचे सीडीआर तपासले आहेत. त्यातील काही संशयित आरोपींची नावे निष्पन्न झालेली आहेत. त्यांच्या विरोधात सक्षम पुरावे मिळाल्यानंतर आम्ही त्यांना अटक करणार आहोत, अशी माहिती तांबे यांनी न्यायालयात दिली.

Web Title: Another big revelation in the Pune Porsche accident case; How are blood samples taken? information in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.