Chandni Chauk Pune: चांदणी चौकात सहा महिन्यांत उभारला जाणार दुसरा पूल

By नितीश गोवंडे | Published: October 3, 2022 03:40 PM2022-10-03T15:40:09+5:302022-10-03T15:42:57+5:30

या उड्डाण पुलाच्या प्रकल्पामुळे पुण्याहून कोथरूड मार्गे, मुळशी, हिंजवडी, सातारा, मुंबई, पाषाण, बावधन कडे ये-जा करण्यासाठी सोपे होणार आहे....

Another bridge will be constructed at Chandni Chowk in six months Chandni Chauk Pune | Chandni Chauk Pune: चांदणी चौकात सहा महिन्यांत उभारला जाणार दुसरा पूल

Chandni Chauk Pune: चांदणी चौकात सहा महिन्यांत उभारला जाणार दुसरा पूल

Next

पुणे : वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्गावरील लेन वाढवण्यासाठी शनिवारी (१ ऑक्टोबर) मध्यरात्री एक वाजता चांदणी चौकातील पूल पाडण्यात आला. याठिकाणी येत्या सहा महिन्यात ११२ मीटरचा नवीन पूल देखील बांधला जाणार आहे. सोमवारी महामार्गावरील लेन वाढवण्यासाठी दुपारी १२ आणि २ वाजता बाजूचा खडक ब्लास्टद्वारे फोडण्यात आला. यावेळी दोन्ही बाजूची वाहतुक २० मिनीटांसाठी थांबवण्यात आली होती.

महामार्ग प्राधिकरणाने पूल पाडल्यानंतर लगेचच दोन सर्व्हिस रोड बनवण्याचे काम हाती घेतले असून, येत्या ७ दिवसात हे रोड पूर्ण होतील अशी माहिती महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ३९७ कोटी रुपयांच्या चांदणी चौकातील उड्डाणपुल प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून भूसंपादनाच्या कामामुळे उर्वरीत काम रखडले आहे. ११२ मीटरच्या पूलासाठी ९ ठिकाणच्या जागा मिळणे गरजेचे आहे. ९ पैकी ७ ठिकाणच्या जागा मिळाल्या असून उर्वरीत दोन जागा वेळेत हस्तांतरीत झाल्या तर पूलाचे काम येत्या मार्च २०२३ पर्यंत होईल अशी आशा एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना आहे.

सोमवारी महामार्गावरील लेन वाढवण्यासाठी बाजूच्या खडकांवर ब्लास्ट करण्यात आला. आज मंगळवारी देखील अशाचप्रकारे दोन ब्लास्ट केले जाणार असून सहा महिन्यात या चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुढील अनेक वर्षांपर्यंत मिटणार आहे. या उड्डाण पुलाच्या प्रकल्पामुळे पुण्याहून कोथरूड मार्गे, मुळशी, हिंजवडी, सातारा, मुंबई, पाषाण, बावधन कडे ये-जा करण्यासाठी सोपे होणार आहे.

ठळकपणे दिशादर्शक फलक असणे गरजेचे...
चांदणी चौकातील उड्डाणपुल प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पण नव्याने सुरू झालेल्या रस्त्यांवरून ये-जा करताना वाहन धारकांना दिशादर्शक फलक दिसतील असे ठळकपणे न लावले गेल्याने अडचण होत आहे. यामुळे नेमके कुठून-कुठे जायचे असा संभ्रम वाहन चालकांना होत आहे. यावेळी शहराबाहेरून आलेल्या वाहन चालकाला मोठी अडचण भेडसावत असल्याने ठळकपणे दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे.

Web Title: Another bridge will be constructed at Chandni Chowk in six months Chandni Chauk Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.