डीएसकेंविरोधात आणखी एक गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 01:10 AM2017-11-23T01:10:33+5:302017-11-23T01:10:43+5:30
पुणे : डीएसके विश्वमधील आनंदघन प्रकल्पातील सदनिकेचा ताबा न दिल्याने बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला
पुणे : डीएसके विश्वमधील आनंदघन प्रकल्पातील सदनिकेचा ताबा न दिल्याने बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या एक वर्षांपासून या प्रकल्पाचे काम बंद आहे. त्यामुळे ग्राहकांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
संतोष होनकरपे (रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. धायरीतील डीएसके विश्वमधील आनंदघन फेज ६चे २०१३मध्ये बांधकाम सुरू केले होते. या प्रकल्पात साडेचारशे सदनिका बांधण्यात येणार होत्या. त्यातील अनेकांना डिसेंबर २०१६मध्ये सदनिकेचा ताबा देण्यात येणार होता. मात्र, सदनिकेचे हप्ते सुरू झाले, तरी सदनिकेचा ताबा नसल्याने त्रस्त झालेल्या ग्राहकांनी पोलिसांत धाव घेतली आहे.