तथाकथित माहिती अधिकाऱ्यांवर आणखी एक गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:28 AM2021-02-20T04:28:14+5:302021-02-20T04:28:14+5:30
हरीश कानसकर यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी कानसकर यांनी फसवणूक ...
हरीश कानसकर यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी कानसकर यांनी फसवणूक केली असल्यास पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचे आव्हान केले होते. कोरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हेमंत अशोक पडवळ (रा. लोणी, ता. आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश कानसकर यांने लोणी येथील हॉटेल शिवांशमध्ये जाऊन मी विशेष पोलीस अधिकारी आहे. तुमच्या हॉटेलच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. मी मंचरचे काम पाहत आहे. करोना काळात हॉटेल चालू आहे. तुम्ही हॉटेल सुरू कसे ठेवले. तुमच्या हॉटेलचे लायसन मी रद्द करू शकतो, अशी धमकी देऊन जून २०२० मध्ये ४ हजार रुपये, जुलैमध्ये ३ हजार तर डिसेंबरमध्ये २ हजार रुपये कानसकर व त्याच्या साथीदारांनी नेले आहेत. त्याच्याबरोबर सागर संतोष वाघ (रा. थोरांदळे, ता. आंबेगाव) भरत सुखदेव ढवळे (रा. पारगाव, ता. आंबेगाव), नवनाथ बन्सी थोरात (रा. रांजणी, ता. आंबेगाव) हे होते. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे करत आहेत.