जातेगावखुर्दमधील दुसरा बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:12 AM2021-09-22T04:12:54+5:302021-09-22T04:12:54+5:30
जातेगाव खुर्द येथील नागरिकांना वारंवार या भागामध्ये एकाच वेळी दोन बिबटे दिसून येत होते. यामुळे या ठिकाणी ...
जातेगाव खुर्द येथील नागरिकांना वारंवार या भागामध्ये एकाच वेळी दोन बिबटे दिसून येत होते. यामुळे या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार शिरूर वनविभागाच्या वतीने जातेगाव खुर्द येथील तांबे वस्ती येथे ग्रामपंचायत सदस्य महेश मासळकर यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आलेला होता. १२ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला असल्याचे निदर्शनास आले होते. यावेळी शिरुर वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक बबन दहातोंडे, वनमजूर आनंदा हरगुडे, वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भाडळे, सर्पमित्र शेरखान शेख, सर्पमित्र अमोल कुसाळकर, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, पोलीस नाईक संतोष शिंदे, प्रताप कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिक व ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला शिरूर वनपरीक्षेत्र कार्यलय येथे दाखल केले. यावेळी शिरूर वनविभागाच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी करत जुन्नर येथील बिबट निवारण केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, याठिकाणी पुन्हा एक बिबट्या असल्याने पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्या नुसार शिरुर वनविभागाने पुन्हा येथे पिंजरा लावला. या पिंजऱ्यात मंगळवारी पुन्हा येथील एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला. शिरूर वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक बबन दहातोंडे यांसह आदींनी बिबट्याला ताब्यात घेतले.
फोटो जातेगा येथे पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या. (धनंजय गावडे)