राजुरी परिसरात दुसरा बिबट्याही जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:11 AM2021-09-21T04:11:37+5:302021-09-21T04:11:37+5:30
राजुरी भोवताली ऊस व पाणी असल्याने बिबट्याला लपण्यासाठी चांगली परिस्थिती आहे. यामुळे त्यांचा अधिवास वाढला आहे. बिबट्याचे या परिसरात ...
राजुरी भोवताली ऊस व पाणी असल्याने बिबट्याला लपण्यासाठी चांगली परिस्थिती आहे. यामुळे त्यांचा अधिवास वाढला आहे. बिबट्याचे या परिसरात पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहे. २० दिवसांपूर्वी राजुरी परिसरात गव्हाळीमळा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ३ वर्षांचा बालक जखमी झाला होता. या घटनेनंतर वनविभागाने परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले होते. शुक्रवारी रात्री परिसरात डोबीमळा येथे सुदाम खंडू हाडवळे यांचे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात मादी जातीचा बिबट्या जेरबंद झाला. यानंतर वनविभागाने पुन्हा त्याच ठिकाणी पिंजरा लावला व शनिवारी मध्यरात्री या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. जेरबंद बिबट्या मादी जातीचा साडेचार वर्षे वयाचा असल्याचे व त्यास माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात हलविले असल्याचे ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके यांनी सांगितले.