पुण्यात काेराेनाचा आणखी एक नवा व्हेरिएंट, राेगप्रतिकारशक्तीला देताे चकवा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 09:09 PM2022-07-06T21:09:37+5:302022-07-06T21:11:45+5:30
नव्या व्हेरिएंटचा शाेध पुण्यातील बीजे वैदयकीय महाविदयालयाच्या प्रयाेशाळेने लावला...
पुणे : काेराेनाच्या बीए. ४ आणि बीए.५ या व्हेरिएंटनंतर पुण्यात आणखी एका नव्या व्हेरिएंटचे दहा रुग्ण आढळून आले आहेत. बीए. २.७५ असे या नव्या व्हेरिएंटचे नाव आहे. विशेष म्हणजे हे नवे व्हेरिएंट लसीचे दाेन डाेस घेतलेले असले तरी प्रतिकार शक्तीला ते चकवा देऊ शकतात व त्यांना पुन्हा संसर्ग हाेउ शकताे, अशी माहीती तज्ज्ञांनी दिली आहे.
या नव्या व्हेरिएंटचा शाेध पुण्यातील बीजे वैदयकीय महाविदयालयाच्या प्रयाेशाळेने लावला आहे. साथराेग विभागाने दिलेलया माहीतीनुसार हे दहाही रूग्ण पुण्यातील रहिवाशी असून ते २१ ते २९ जून दरम्यान आढळून आले हाेते. ते सर्व लक्षणविरहीत हाेते व घरीच उपचार घेउन बरे झाले. घरीच हे रुग्ण बरे झाल्याने ही एक बाब दिलासादायक आहे.
दरम्यान बीए.४ चे ३ आणि बीए.५ चे ६ नवे रुग्णांचे बुधवारी निदान झाले. ते सर्व पुण्यातील रहिवाशी आहेत. या दाेन्ही व्हेरिएंटचे राज्यात ७३ रुग्ण झाले असून त्यापैकी पुण्यात २४, मुंबई ३४ व नागपुर, ठाणे व पालघर येथे प्रत्येकी ४ रुग्ण आढळून आले आहेत. तर रायगडमध्ये ३ रुग्ण आतापर्यंत आढळून आलेले आहेत.
नव्या व्हेरिएंटबाबत अधिक माहीती देताना बीजे वैदयकीय महाविदयालयाच्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख तथा इन्साकाॅगचे शास्त्रज्ञ डाॅ. राजेश कार्यकर्ते म्हणाले की, बीए. २.७५ चे या व्हेरिएंटमध्ये आणखी काही नवे म्युटेशन्स आढळून आलेले आहेत. त्यामुळे ते प्रतिकारशक्तीला चकवा देउ शकतात व त्यांना संसर्ग करू शकतात. परंतू, याबाबत आणखी अभ्यास करण्यात येणार असून त्यानंतर ते किती गंभीर आहेत याबाबतचे चित्र स्पष्ट हाेईल, असे डाॅ. कार्यकर्ते यांनी स्पष्ट केले.