देवेन शहा खून प्रकरणी आणखी एकाला अटक; डेक्कन पोलिसांची ठाण्यात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 13:03 IST2018-01-23T13:02:26+5:302018-01-23T13:03:54+5:30
देवेन शहा खून प्रकरणात डेक्कन पोलिसानी ठाणे येथून आणखी एकाला अटक केली. सुरेंद्रपाल असे त्याचे नाव आहे. रवी चोरगे याला रविवारी अटक केल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहिती वरून पोलिसानी ही कारवाई केली.

देवेन शहा खून प्रकरणी आणखी एकाला अटक; डेक्कन पोलिसांची ठाण्यात कारवाई
पुणे : देवेन शहा खून प्रकरणात डेक्कन पोलिसानी ठाणे येथून आणखी एकाला अटक केली. सुरेंद्रपाल असे त्याचे नाव आहे.
रवी चोरगे याला रविवारी अटक केल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहिती वरून पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींनी सुरेंद्रपाल याच्याकडे पिस्तुले ठेवली होती. त्याला अटक करून ती जप्त करण्यात आली आहे.
डेक्कन पोलिसांनी कालच रवींद्र सदाशिव चोरगे (वय ४१, रा़ निलपद्म सोसायटी, अमृतनगर, माणिकबाग, सिंहगड रोड) याला रविवारी जळगाव येथून ताब्यात घेऊन अटक केली होती. रवी चोरगेकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत त्याने काही माहिती दिली आहे़ देवेन शहा यांच्याबरोबर रवींद्र चोरगे आणि राहुल शिवतारे यांचा संपर्क होता़ रवी रियल इस्टेटचे काम करतो़ शेतकऱ्यांच्या जमिनी एकत्र करून त्या मोठ्या रियल इस्टेट एजंटांना विकणे व त्यातून कमिशन घेणे, असा त्याचा व्यवसाय होता.