Tukaram Supe: तुकाराम सुपेच्या घर, कार्यालयांमध्ये छापेमारीत आणखी 33 लाख सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 01:41 PM2021-12-24T13:41:24+5:302021-12-24T19:49:36+5:30

तुकाराम सुपे यांच्या घरी, कार्यालयांमध्ये पुणे पोलिसांनी केलेल्या छापेमारी मध्ये आत्तापर्यंत 3 कोटी 15 लाख रुपये रोकड जप्त करण्यात आले आहेत

Another Rs 33 lakh was recovered from Tukaram Supes house and offices | Tukaram Supe: तुकाराम सुपेच्या घर, कार्यालयांमध्ये छापेमारीत आणखी 33 लाख सापडले

Tukaram Supe: तुकाराम सुपेच्या घर, कार्यालयांमध्ये छापेमारीत आणखी 33 लाख सापडले

googlenewsNext

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे निलंबित आयुक्त तुकाराम सुपेच्या घर आणि कार्यालयांमध्ये काल सायंकाळी केलेल्या छापेमारीत ३३ लाख सापडले आहेत. सुधा तुकाराम सुपे यांच्या घरी २५ लाख रुपये सापडले होते. तुकाराम सुपे यांच्या घरी, कार्यालयांमध्ये पुणेपोलिसांनी केलेल्या छापेमारी मध्ये आत्तापर्यंत 3 कोटी 15 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. तर दीड किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत तुकाराम सुपे यांच्या घरातून जप्त केलेली रोकड आणि सोन्याचे दागिने एकूण 3 कोटी 90 लाख इतके आहे.

मुलगी आणि जावयाकडे दिलेल्या बॅगेत आढळले होते १ कोटी 

राज्य परीक्षेचा आयुक्त तुकाराम सुपे याने मुलगी व जावयाकडे दिलेल्या बॅगा जप्त केल्या असून त्यात तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांची रोकड तसेच एकूण ४४ वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असा जवळपास २ कोटी रुपयांहून अधिकचा ऐवज जप्त केला होता. तपासात सापडलेल्या दागिन्यांचे मुल्यांकन सोनारांमार्फत करण्यात आले होते.

तुकाराम सुपे याच्या घरी यापूर्वी ८८ लाख रुपयांची रोकड, दागिने असा ९६ लाख

घरी दुसऱ्यांदा टाकलेल्या धाडीमध्ये २ कोटी रुपयांची रोकड, दागिने सापडले असून पोलिसांनी जप्त केले आहेत. तुकाराम सुपे याला पोलिसांनी पकडल्याचे समजल्यानंतर त्याच्या पत्नीने हा ऐवज मेव्हणाकडे दिला होता. पोलीस चौकशीत ही माहिती पुढे आल्यानंतर पोलिसांनी १ कोटी ९८ लाख रुपयांची रोकड व दागिने जप्त केले आहेत. याअगोदर तुकाराम सुपे याच्या घरातून ८८ लाख रुपयांची रोकड, दागिने, ५ लाख ५० हजारांच्या ठेवी असा ९६ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला होता.

सुपे आणि सावरीकर यांच्या पोलीस कोठडीमध्ये ३० डिसेंबरपर्यंत वाढ 

न्यायालयाने सुपे आणि सावरीकर यांच्या पोलीस कोठडीमध्ये ३० डिसेंबरपर्यंत वाढ केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जी. डोलारे यांनी हा आदेश दिला. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणामध्ये सुपे व सावरीकर यांच्यासह अन्य सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Another Rs 33 lakh was recovered from Tukaram Supes house and offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.