आजाराची उत्तरे औषधात नसून आरोग्य शिक्षणात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:13 AM2021-09-06T04:13:09+5:302021-09-06T04:13:09+5:30

एस... स्टडी... एका जागी नियमितपणे बसून केलेला अभ्यास परीक्षेची भीती कमी करतो. कंटाळा आला असता एखादा खेळ अथवा छंद ...

The answer to illness is not in medicine but in health education! | आजाराची उत्तरे औषधात नसून आरोग्य शिक्षणात !

आजाराची उत्तरे औषधात नसून आरोग्य शिक्षणात !

Next

एस... स्टडी... एका जागी नियमितपणे बसून केलेला अभ्यास परीक्षेची भीती कमी करतो. कंटाळा आला असता एखादा खेळ अथवा छंद जोपासावा, त्यामुळे आपोआपच मेंदूला विश्रांती मिळून मन पुन्हा ताजेतवाने होते आणि नव्या जोमाने अभ्यास करावासा वाटतो.

टी... थिंकिंग... वेगळा विचार करायची क्षमता असायला हवी, सोपी सोपी वाचन व लेखन कौशल्ये शिकून घ्यावीत, वर्तमानपत्रे वाचावीत, शब्दकोडी सोडवावीत, आगामी काळात किंवा यापुढे वेगळा विचार करणारा किंवा नवनवीन कल्पना साकारणाराच विद्यार्थी यशस्वी होणार आहे.

यू... यू म्हणजे तू... स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा याची जाणीव किंवा माहिती मुलांनी करून घेतली पाहिजे. अपयश हा गुन्हा नसून हीन ध्येय किंवा कमी दर्जाचे... गुणवत्तेचे ध्येय साध्य करणे हा गुन्हा आहे. कारण 'मंजिल उन्ही को मिलती है जिनके सपनो में जान होती है, उडान पंखोसे नही, बुलंद होसलोंसे होती हैं...'। प. पू. वामनराव पै यांचा संदेश 'तूच तुझ्या जीवनाचा खरा शिल्पकार आहेस', कधीही विसरू नका.

डी... डाएट... आहार हा आरोग्याचा आधार आहे, त्यामुळे अन्नाचा आदर करा, टीव्ही न बघता लक्षपूर्वक अन्नग्रहण करा. मन अन्नमय आहे. तुम्ही जे खाता व जसं खाता तसं बनता. तेव्हा सकस आहार असावा. आहारात पालेभाज्या, फळभाज्या, कोशिंबिरी, उसळी, मोड आलेली कडधान्ये, वरण भात, - आमटी, लिंबू, दाण्याचा किंवा बेसनाचा लाडू, डाळ - फुटाणे, कणकेची बिस्किटे अशा विविध पदार्थांचा समावेश असावा कारण लोह अथवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कंटाळा, थकवा किंवा उदासपणा जाणवतो. उगाचच चिडचिड होते, हातपाय दुखतात.

... एक्झरसाइज... व्यायाम... अभ्यास हा बुद्धीचा व्यायाम असेल तर व्यायाम हा शरीराचा अभ्यास आहे. तो देखील नियमित करावा. जमल्यास मैदानी खेळ, तास, पोहणे, किंवा मग घरच्या घरी पी.टी. सारखे व्यायाम, योगासने यापैकी जो आवडेल तो व्यायाम मनापासून करावा. त्यामुळे स्नायू बळकट होतात, दृष्टी सुधारते, भूक लागते, सर्वांगीण वाढ चांगली होते. लवकर कंटाळा येत नाही. उत्साह वाढतो. मेंदू तल्लख होतो. चपळपणा वाढतो.

एन... न्यू लर्निंग... नवीन काही शिका... वेगळे काही करा, उदा : उजव्याऐवजी डाव्या हाताने ब्रश करा, जेवण लेखन करून बघा, डोळे मिटून कपडे घालून बघा, करा, अंघोळ करा, एक दिवस डोळ्यांवर पट्टी बांधून घरात वावरा, उलटसुलट पाढे किंवा आकडे म्हणण्याचा प्रयत्न करा, वेगळ्या वाटेने घरी जा यामुळे आपल्या मेंदूची क्षमता वाढते आणि आपलीच आपल्याला नव्याने ओळख होते.

टी... ट्राय... संकट येणार, समस्या येणार आणि त्यातूनच आपण स्वत:ला सहनशील बनवायला शिकणार. चालायला शिकताना पडणार, सायकल शिकताना गुडघे फुटणार, पोहायला शिकताना नाका - तोंडात पाणी जाऊन गुदमरणार, मात्र प्रयत्नच केला नाही तर आपण गंजणार कारण यूज ऑर लूज हा निसर्गाचाच नियम आहे. तेव्हा 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' हे विद्यार्थी दशेत आपले एक जीवनसूत्र असायला हवे.

हे झालं सगळं मुलांसाठी पण पालक आणि शिक्षकांना एक गोष्ट सांगावीशी वाटते, “मुलांना जीवनाच्या सर्व सीमा समजावून द्या... पायात पादत्राण लागते, अंगात कपडे लागतात, पोटात अन्न लागते, अंगात बळ लागते, मनात विचार असावे लागतात, वृत्तीत धडपडण्याची धमक असावी लागते, सर्वार्थाने आपला तोल संभाळून समतोल जीवन जगता आले पाहिजे, जे जे कळत नाही ते समजावून देता आले पाहिजे, जे कळावयास हवे ते खरोखरच समजलेले आहे का नाही हे देखील कळावयास हवे". या लेखाच्या निमित्ताने सर्वांनाच आरोग्यपूर्ण शुभेच्छा !!

- डॉ. प्रदीप सेठिया

Web Title: The answer to illness is not in medicine but in health education!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.