भारतीय संगीतातून शांतरसाची अनुभूती - पं. उल्हास कशाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 02:01 AM2018-01-02T02:01:39+5:302018-01-02T02:01:49+5:30

भारतीय संगीतात शांतरस आहे, जे इतर संगीतात मिळत नाही. म्हणून याला आध्यात्मिक स्थान दिले आहे. आपल्या येथे संगीताला अध्यात्माशी जोडल्यामुळे त्यातून आत्मशांतीचा अनुभव होतो. जो शरीर व मनला प्रसन्न करतो, असे प्रतिपादन पं. उल्हास कशाळकर यांनी व्यक्त केली.

 Anthropology from Indian Music - Pt. Ulhas Barkalkar | भारतीय संगीतातून शांतरसाची अनुभूती - पं. उल्हास कशाळकर

भारतीय संगीतातून शांतरसाची अनुभूती - पं. उल्हास कशाळकर

Next

लोणी काळभोर - भारतीय संगीतात शांतरस आहे, जे इतर संगीतात मिळत नाही. म्हणून याला आध्यात्मिक स्थान दिले आहे. आपल्या येथे संगीताला अध्यात्माशी जोडल्यामुळे त्यातून आत्मशांतीचा अनुभव होतो. जो शरीर व मनला प्रसन्न करतो, असे प्रतिपादन पं. उल्हास कशाळकर यांनी व्यक्त केली.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे राजबाग, लोणी-काळभोर येथील विश्वराज बंधारा येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’
संगीत महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध गायक पं. हदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मध्य प्रदेश सरकारच्या तानसेन सन्मानाचे मानकरी पंडित उल्हास कशाळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
पं. हदयनाथ मंगेशकर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी ध्रुपद गायक पं. उदय भवळकर, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन. पठाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष आवळे, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी आर्ट, डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनिल राय, विश्वशांती संगीत कला अकादमीचे महासचिव श्री. आदिनाथ मंगेशकर व श्री. सुरेंद्र मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली श्रीखंडे यांनी केली. डॉ. सुनील राय यांनी आभार मानले. एमआयटी सांस्कृतिक संध्येची सुरुवात शहनाई वादक तुकाराम दैठणकर यांच्या सुमधूर शहनाई वादनाने झाली.

थोर गायकांचा सत्कार करून मी स्वत:चा सत्कार केला आहे असे मानतो. दहा वषार्पूर्वी संगीत कला अकादमी कशी असवी सात सुरांचे सात बंगले असावे. गार्डन असावे असे मी स्वप्न पाहिले होते. त्या संबंधी मी श्रीकृष्ण कर्वे गुरूजी यांच्याकडे बोललो होतो. त्याप्रमाणे ते जगातील एकमेव असे संगीत क्षेत्रातील अद्धितीय अकादमी डॉ. कराड यांनी प्रत्यक्षात साकार केले.
- पं.हदयानाथ मंगेशकर

संगीताच्या साधनेतून शांतरसाची अनुभूती मिळते. पाश्चिमात्य संस्कृतीच्या अतिक्रमणामुळे भारतीय संस्कृतीचा आजच्या पिढीला विसर पडत चालल्याचे दिसत आहे. तो परिचय त्यांना व्हावा, यासाठी हा उपक्रम आहे. भारतरत्न लतादीदींच्या आशीवार्दाने आज येथे संगीत कला अकादमी उभी राहिली आहे. संगीताच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जगाला दर्शन घडणार आहे. संगीताच्या माध्यमातून जगात सुख, शांती व समाधान नांदेल.
- प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड

Web Title:  Anthropology from Indian Music - Pt. Ulhas Barkalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :musicसंगीत