धनगर समाजाचा भाजपाविरोधी एल्गार; लोणावळ्यात राजकीय-सामाजिक मार्गदर्शन शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 03:25 PM2017-12-20T15:25:51+5:302017-12-20T15:49:54+5:30

धनगर समाजाला आरक्षण द्या अन्यथा आगामी २०१९ च्या निवडणुकीत भाजपा सरकारला धनगर समाज त्यांची जागा दाखवून देईल, अशा इशारा महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते डॉ. सुरेश वाघमारे यांनी दिला आहे.

Anti-BJP Elgar of Dhangar Samaj; Political-social guidance camp in Lonavla | धनगर समाजाचा भाजपाविरोधी एल्गार; लोणावळ्यात राजकीय-सामाजिक मार्गदर्शन शिबिर

धनगर समाजाचा भाजपाविरोधी एल्गार; लोणावळ्यात राजकीय-सामाजिक मार्गदर्शन शिबिर

Next
ठळक मुद्दे'तरुण बांधवानी स्वत: च रोजगार उपलब्ध करून उद्योग व्यवसाय करावा' भाजपा सरकारला धनगर समाज त्यांची जागा दाखवून देईल : डॉ. सुरेश वाघमारे

लोणावळा : धनगर समाजाला आरक्षण द्या अन्यथा आगामी २०१९ च्या निवडणुकीत भाजपा सरकारला धनगर समाज त्यांची जागा दाखवून देईल, अशा इशारा महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते डॉ. सुरेश वाघमारे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र विकास आघाडी यांच्या वतीने धनगर समाजातील तरुणांसाठी रोजगार निर्मिती, संघटन व राजकीय सामाजिक या विषयावर लोणावळ्यात आयोजित मार्गदर्शन शिबिरात वाघमारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी बोलताना डॉ. वाघमारे म्हणाले, की निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमची सत्ता आल्यास १५ दिवसांत धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन धनगर समाजाला दिले होते. मात्र भाजपा सरकारची सत्ता येऊन तीन वर्षे उलटून गेली तरी धनगर समाजाला आरक्षण दिलेले नाही. भाजपा सरकारने धनगर समाजाची फसवणूक केली आहे. धनगर समाजातील तरुणांनी शिक्षणाची कास धरत स्वत: च्या पायावर उभे राहायला शिकावे, यापुढील काळात आपल्याला सरकारवर नोकऱ्यांसाठी अवलंबून राहता येणार नाही त्यासाठी सरकार आपल्याला कर्जही द्यायला तयार नाही याकरिता तरुण वर्गाने एकत्र येऊन उदयोग धंदा करावा. जो पर्यंत धनगर समाज एकसंघ होणार नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही त्याकरिता समाजातील तरुण बांधवानी स्वत: च रोजगार उपलब्ध करून उद्योग व्यवसाय करावा, असे आवाहन यावेळी महाराष्ट्र विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. अण्णाराव पाटील, डॉ सुभाष माने, डॉ सुरेश वाघमारे, वसंत उबाळे या मान्यवरांनी केले.
यावेळी मावळ तालुका धनगर समाजाचे अध्यक्ष बबन खरात, मावळ तालुका ओबीसी महासंघाचे अध्यक्ष भरत कोकरे, उपसरपंच बाळासाहेब आखाडे, माजी पंचायत समिती सदस्य हरीश कोकरे, सरपंच बाळासाहेब झोरे, रायगड जिल्हा धनगर समाज सचिव अनंता हिरवे, खालापूर तालुका धनगर समाज अध्यक्ष हरेश ढेबे, सचिव चंद्रकांत हिरवे, पनवेल तालुका धनगर समाज अध्यक्ष लक्ष्मण बावदाने, उपाध्यक्ष संतोष शिंगाडे, उपसरपंच संतोष खरात, दिलीप झोरे, अहिल्याबाई होळकर युवा धनगर संघटनेचे अध्यक्ष गणेश आखाडे उपाध्यक्ष सतिश गोरे, संजय मरगले, शंकर मारंगले, अरविंद गोरे, लहू ठिकडे, बबन हिरवे उपस्थित होते.

Web Title: Anti-BJP Elgar of Dhangar Samaj; Political-social guidance camp in Lonavla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.