कामगार कायद्यात विरोधी बदल; कामगार संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:13 AM2021-09-24T04:13:03+5:302021-09-24T04:13:03+5:30

बारामती : केंद्रातील सत्तारुढ असणाऱ्या भाजपा सरकारने देशात कामगार कायद्यामध्ये अत्यंत भयानक असे कामगार विरोधी बदल केले आहेत. ...

Anti-labor law changes; Trade unions are aggressive | कामगार कायद्यात विरोधी बदल; कामगार संघटना आक्रमक

कामगार कायद्यात विरोधी बदल; कामगार संघटना आक्रमक

googlenewsNext

बारामती : केंद्रातील सत्तारुढ असणाऱ्या भाजपा सरकारने देशात कामगार कायद्यामध्ये अत्यंत भयानक असे कामगार विरोधी बदल केले आहेत. कामगारांची सेवा सरक्षा वेतन सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा धोक्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपामध्ये सर्व संघटित, असंघटित, कंत्राटी, खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील कामगार संघटना २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या संपात सहभागी होणार आहेत.

याबाबत ग्रीव्हीज कॉटन ॲण्ड अलाईड कंपनीज एम्प्लॉईज युनियन पियाजो युनिटच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. कोरोना काळातील शांततेचा फायदा घेऊन संरक्षण, विमा व बँकांसारख्या मूलभूत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमदेखील विकण्याच्या हालचाली सुरू आहेत. सर्वत्र कंत्राटीकरण सुरू आहे. कोरोना काळात कोट्यवधी लोकांचा रोजगार गेलेला आहे. अतिवृष्टी व नापिकीमुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आलेला असताना त्यांना तत्काळ साह्य देण्याची गरज आहे. त्याचवेळी शेतकऱ्यांना बड्या जागतिक व्यापारी कंपन्यांच्या दावणीला बांधणारे कायदेदेखील केलेले आहेत. या सर्वाच्या विरोधात तसेच दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपामध्ये सर्व संघटित, असंघटित, कंत्राटी, खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आयटक सहभागी असलेल्या पुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समिती या संपामध्ये सहभागी आहे. म्हणून आपल्या कंपनीतील सर्व कामगार बंधू-भगिनी आयटकच्या मार्गदर्शनाखाली या संपामध्ये सहभागी होणार असल्याचे संघटनेच्यावतीने कळविण्यात आले आहे.

सोमवारी (दि २७) संबंधितांनी कोणीही कामावर न येता आपल्या न्याय्य मागण्यांसाठी या संपामध्ये सहभागी व्हावे, तसेच सकाळी ठीक १०.३० वा. तहसीलदार कार्यालय (प्रशासकीय भवन) बारामती येथे निवेदन देण्यासाठी सर्व कामगार बंधू-भगिनींनी उपस्थित राहणार असल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले, तसेच सरकारी नियमानुसार कोरोनाविषयक सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Anti-labor law changes; Trade unions are aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.