Pune: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ विरोधी विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 03:11 PM2024-09-08T15:11:08+5:302024-09-08T15:11:17+5:30

पोलिसांच्या पथकाने शेखच्या घरातून ४० लाख रुपयांचे २०२ ग्रॅम एमडी, देशी बनावटीचे पिस्तूल आणि मोबाईल असा ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

Anti Narcotics Department action in the wake of Ganeshotsav | Pune: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ विरोधी विभागाची कारवाई

Pune: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ विरोधी विभागाची कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीअमली पदार्थ विक्रेत्यांवर करडी नजर ठेवली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढव्यात छापा टाकून ४० लाख रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) आणि देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले.

कोंढव्यातील भाग्योदयनगर परिसरात समीर शरीफ शेख (वय २२, रा. सय्यद काझी हाईट्स, कोंढवा) याच्याकडे एमडी असल्याची माहिती गस्त घालणारे अमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलिस निरीक्षक उल्हास कदम यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने शेख याच्या घरावर छापा टाकला. पोलिसांच्या पथकाने शेखच्या घरातून ४० लाख रुपयांचे २०२ ग्रॅम एमडी, देशी बनावटीचे पिस्तूल आणि मोबाईल असा ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उल्हास कदम, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, संदीप शिर्के, प्रवीण उत्तेकर, संदेश काकडे, दयानंद तेलंगे पाटील, विपुल गायकवाड, योगेश मोहिते, रेहाना शेख यांनी ही कारवाई केली.

गांजा विक्रीप्रकरणी तिघे अटकेत..

बिबवेवाडी भागातील चैत्रबन सोसायटी परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. आयुष अनंत शिंदे (वय २०, रा. शनिमंदिरामागे, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून ५३० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. नगर रस्त्यावर गांजा विक्रीसाठी आलेल्या आकाश राजू घाेरपडे (२३, रा. दत्त मंदिराजवळ, खुळेवाडी, विमाननगर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ७०५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. घोरपडेचा साथीदार धनंजय दशरथ पवार याला अटक करण्यात आली. दोघांविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अमली पदार्थ विरोधी पथकाचे (दोन) वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Anti Narcotics Department action in the wake of Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.