संसर्गानंतरही अॅँटिबॉडी चाचणी येऊ शकते निगेटिव्ह; केवळ चाचणीवर अवलंबून न राहण्याची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 04:07 AM2020-09-14T04:07:56+5:302020-09-14T04:08:18+5:30
चाचणी निगेटिव्ह आली, याचा अर्थ संसर्ग झालेला नाही, असा होत नसल्याचे बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाचे उपअधिष्ठाता, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले.
- राजानंद मोरे
पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन गेला आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी अँटिबॉडी चाचणीचा आग्रह धरला जातो. पण संसर्ग होऊन गेला तरी अनेकांमध्ये चांगल्या प्रतिकारशक्तीमुळे चाचणीत कळून येतील इतपत अँटिबॉडी तयार झालेल्या नसतात. चाचणी निगेटिव्ह आली, याचा अर्थ संसर्ग झालेला नाही, असा होत नसल्याचे बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाचे उपअधिष्ठाता, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले.
प्रश्न : अँटिबॉडी तयार झाल्यानंतर पुन्हा संसर्ग होऊ शकतो का?
अँटिबॉडीज दर २१ दिवसंनंतर घातांकीय पद्धतीने कमी होत जातात. ही प्रक्रिया होताना कोरोना विषाणूंना ओळखणाऱ्या ‘मेमरी सेल्स’ तयार होतात. काही दिवसांनी कोरोना विषाणूने आपल्या शरीरात प्रवेश केल्यास या पेशी कोरोना विषाणूंना जलदरीतीने ओळखून त्यांना मारून टाकतात. त्यामुळे पुन्हा संसर्ग होऊ शकत नाही.
प्रश्न : कोरोना चाचणीप्रमाणेच अँटिबॉडी चाचणी करावी का?
अँटिबॉडी चाचणी केली तरी त्याचा फायदा होईलच असे नाही. कारण अँटिबॉडीजचे प्रमाण कमी असल्यास चाचणीमध्ये ते कळत नाही. त्यामुळे चाचणी निगेटिव्ह येऊ शकते. याचा अर्थ अद्याप कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नाही, असा होत नाही.
प्रश्न : अँटिबॉडीज चाचणी कशी केली जाते?
आपल्याकडे अँटिबॉडीजचे प्रमाण किती आहे, हेच प्रामुख्याने मोजले जाते. पण या अँटिबॉडीज किती सक्षम आहेत, हे पाहण्यासाठी ‘न्युट्रलायझेशन’ ही चाचणी केली जाते. ही चाचणी क्लिष्ट असल्याने काही ठरावीक ठिकाणीच उपलब्ध आहे.
प्रश्न : अँटिबॉडीज तयार होणे म्हणजे काय?
विषाणूंना ओळखणाºया पांढºया रक्तपेशीतील विशिष्ट पेशी ज्यांना ‘हेल्पर टी सेल्स किंवा टी सेल्स किंवा सीडी ४ सेल्स’ म्हटले जाते, त्या आपले कार्य सुरू करतात व ‘सीडी ८’ या विषाणू मारणाºया पेशींना उत्तेजित करतात. या पेशी विषाणूचा संसर्ग झालेल्या पेशींना मारतात. यामुळे विषाणूंची वाढ रोखण्यासाठी मदत होते.