गिरिजात्मकाच्या विकासकामांत पुरातत्त्व विभागाचे विघ्न
By admin | Published: November 14, 2014 11:36 PM2014-11-14T23:36:31+5:302014-11-14T23:36:31+5:30
अष्टविनायकातील महत्त्वाचे स्थान असलेल्या लेण्याद्री देवस्थानच्या पर्यटनदृष्टय़ा विकसित होण्यास भारतीय पुरातत्त्व विभागाच्या पुरातन नियमांच्या अडचणीच आड येत आहेत.
Next
नितीन ससाणो - लेण्याद्री
अष्टविनायकातील महत्त्वाचे स्थान असलेल्या लेण्याद्री देवस्थानच्या पर्यटनदृष्टय़ा विकसित होण्यास भारतीय पुरातत्त्व विभागाच्या पुरातन नियमांच्या अडचणीच आड येत आहेत.
सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात देशभरातील सर्वच प्रमुख देवस्थानांमध्ये भाविकांना घरबसल्या देवतांचे दर्शन घेता यावे म्हणून ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु पुरातत्त्व विभागाची सद्यस्थितीत जाचक नियमावली लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाच्या ऑनलाईन दर्शनात विघ्न ठरत आहे.
पुरातत्त्व विभागाच्या नियमाप्रमाणो प्राचीन लेण्यांमध्ये विजेच्या माध्यमातून प्रकाशव्यवस्था करता येत नाही. लेण्याद्री देवस्थानने यापूर्वी गणोशलेणीच्या बाहेर तसेच पायरीमार्गावर गणोशभक्तांसाठी पथदिव्यांची उभारणी केलेली आहे. परंतु पुरातत्त्व विभागाच्या नियमाप्रमाणो गिरिजात्मकाचे स्थान असलेल्या गणोशलेणीत मात्र विजेचा पुरवठा, प्रकाशव्यवस्था करता येत नाही.
लेण्याद्री देवस्थान ट्रस्टला गणोशभक्तांच्या दर्शनासाठी सुरक्षेसाठी क्लोज सर्किट टीव्ही बसविण्याचा आहे. परंतु पुरातत्त्व विभागाच्या नियमामुळे अडचणी येतात. त्यामुळे कॅमेरेच बसले नाहीत तर ऑनलाईन दर्शन कसे देणार असा प्रश्न देवस्थान ट्रस्टसमोर आहे.
4लेण्याद्रीत गणोशदर्शनासाठी जाताना पुरातत्त्व विभाग प्रत्येकी पाच रुपये शुल्क आकारणी करतो. परंतु मुख्य गणोशलेणी वगळता इतर लेण्याकडे जाण्यासाठी सुरक्षित पायवाटदेखील उपलब्ध नाही. लेण्याद्री देवस्थानकडे जाणारा रस्तादेखील पूजा साहित्य विकणा:या व्यासायिकांच्या दुकानांमुळे अरुंद झालेला आहे.
4पुरातत्त्व विभागाकडून एखाद्या कामासाठी परवानगी मिळविणो जिकिरीचे ठरत आहे. पुरातत्त्व विभागानेदेखील पायरीमार्गाची बांधणी, माहिती फलक, बागबगिचा आदी सुविधा गणोशभक्तांना उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु लेण्याद्रीत कोणतीही विकासकामे करताना भारतीय पुरातत्त्व विभाग लेण्याद्री देवस्थान ट्रस्टला विश्वासात घेत नाही. पुरातत्त्व विभाग व लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट यांच्यातील समन्वयाने लेण्याद्री परिसराचा पर्यटनदृष्टय़ा सुनियोजित विकास होऊ शकतो.
4पुरातत्त्व विभागाने गणोशलेणीकडे जाणा:या पायरीमार्गाची पायथ्यापासून दुरुस्ती, बांधणी केलेली आहे. परंतु सध्या काही ठिकाणी पडझड झालेल्या पाय:यांची दुरुस्ती पुरातत्त्व विभाग करत नाही ना लेण्याद्री देवस्थान ट्रस्टला करत येत नाही. मात्र याचा त्रस गणोशभक्तांनाच होतो आहे. गणोशदर्शनाची आस घेऊन लेण्याद्रीचा डोंगर चढून गेल्यानंतर तहानलेल्या व दमलेल्या गणोशभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात पुरातत्त्व विभागाचे नियम अडथळा बनले आहेत.
4प्राचीन लेण्या असल्याने लोणी परिसरातील पायरीमार्गे याचा ताबा भारतीय पुरातत्त्व विभागाकडे आहे. त्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही विकासकाम करता येत नाही. देवस्थान ट्रस्टच्या पथदिव्यांसाठी डोंगरावर नेलेला वीजपुरवठा जमिनीखालून नेण्याचा मानस आहे. कारण खांबावरून उघडय़ावरून नेलेल्या तारांना डोंगरावरील माकडांपासून उपद्रव होतो.
4तसेच गणोशभक्तांच्या सुरक्षेबाबतही प्रश्न निर्माण घेऊ शकतो. परंतु या ठिकाणी देखील पुरातत्त्व विभागाचे धोरण आड येत आहे.