मोकार फिरणाऱ्यांची ॲंटिजन टेस्ट, एक पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:10 AM2021-04-27T04:10:54+5:302021-04-27T04:10:54+5:30

ही कारवाई नारायणगाव पोलीस ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, वारूळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगाव येथे करण्यात आली. सोमवारी सायंकाळी चारच्या ...

Antigen test of Mokar walkers, one positive | मोकार फिरणाऱ्यांची ॲंटिजन टेस्ट, एक पॉझिटिव्ह

मोकार फिरणाऱ्यांची ॲंटिजन टेस्ट, एक पॉझिटिव्ह

Next

ही कारवाई नारायणगाव पोलीस ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, वारूळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगाव येथे करण्यात आली. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास नारायणगाव बसस्थानकच्या मुख्य चौकात ही कारवाई झाली. रस्त्यावर फिरणाऱ्यांची रॅपिड ॲंटिजेन कोरोना टेस्ट केली जात असल्याची माहिती गावात पसरताच गावात फिरणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली व गावात शुकशुकाट पसरला.

जोपर्यंत लॉकडाऊन आहे, तोपर्यंत पोलिसांची दंडात्मक कारवाई सुरू राहील, त्याचबरोबर रॅपिड एन्टेजेन कोरोना टेस्ट मोहीम देखील राबविण्यात येईल माहिती जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे आणि सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

मोहीम राबविण्यासाठी वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रयोगशाळा सहायक मनीषा भावसार, अश्विनी डोके, आरोग्य सहायक सिदेश्वर गुंजकर यांच्यासह विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे आणि सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण पोलीस हवालदार रमेश काटे, संतोष कोकणे , पोपट मोरे, प्रवीण लोहोटे, योगेश गारगुटे व होमगार्ड यांचे सहकार्य लाभले.

यावेळी तहसीलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी माळी, सहायक गटविकास अधिकारी हेमंत गरीबे, नारायणगावचे सरपंच बाबू पाटे, वारूळवाडीचे सरपंच राजेद्र मेहेर यांनीही कारवाई दरम्यान भेट दिली.

--ॉ

फोटो क्रमांकझ २६ नारायणगाव अन्टीजन टेस्ट

फोटो ओळी : रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांची ॲंटिजन टेस्ट करताना आरोग्य विभागाचे कर्मचारी.

Web Title: Antigen test of Mokar walkers, one positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.