बारामती विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजेन तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:09 AM2021-04-24T04:09:47+5:302021-04-24T04:09:47+5:30
कोविड केअर सेनंटर मेडिकल कॉलेज हॉस्टेल बारामती (आरोग्य विभाग बारामती) यांच्या सहकार्याने व बारामती शहर व तालुका पोलीस ठाण्यातील ...
कोविड केअर सेनंटर मेडिकल कॉलेज हॉस्टेल बारामती (आरोग्य विभाग बारामती) यांच्या सहकार्याने व बारामती शहर व तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी यांना घेऊन अचानकपणे शुक्रवारी (दि. २२) बारामती शहरातील विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रॅपीड ॲंटिजेन तपासणी करण्यात आली. बारामती शहरातील तीनहत्ती चौक येथे ५९ व्यक्तींची तपासणी केली पैकी ४ पॉझिटीव्ह आले. तसेच पेन्सिल चौक येथे ६६ व्यक्ती यांची तपासणी केली पैकी ८ पॉझिटिव्ह आले. सर्व पॉझिटिव्ह यांना लगतच्या कोविड केअर सेंटर येथे अॅडमिट केले आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली. राज्यात कडक लॉकडाऊनचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी बारामतीत सुरू करण्यात आली आहे.आता या पार्श्वभूमीवर मोकार फिरणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेने लढविलेली अनोखी शक्कल कौतुकाचा विषय ठरली आहे. नाहक रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांची आरोग्य प्रशासनाच्या मदतीने अॅंटिजेन तपासणी सुरू आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठीही मदत होणार आहे. त्यासाठी स्वतंत्र तपासणी व्हॅन आणि आरोग्य पथक नेमण्यात आले आहे. दरम्यान, बारामतीत कोरोनाचा सलग तिसऱ्या दिवशी उच्चांक कायम आहे. येथील कोरोनाबाधितांची वाढती. संख्या थांबता थांबेना. विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर अशीच कारवाई पुढील कालावधीत करण्यात येईल. नागरिकांनी घरीच थांबून प्रशासनास मदत करावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान, २४ तासांत एकूण आरटीपीसीआर नमुने ६५५ तपासण्यात आले.त्यापैकी एकूण बारामतीमधील २१३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.यामध्ये इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण - २१ आहेत. काल तालुक्यामध्ये खासगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण आरटीपीसीआर त्यापैकी पॉझिटिव्ह -७१आहेत. कालचे एकूण ॲंटिजन २५८, त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१०७ आले आहेत. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३९१ आहेत.यामध्ये शहर-१९५, ग्रामीण- १९६ रुग्णांचा समावेश असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले. आजपर्यंत बारामतीत एकूण रुग्णसंख्येने आता १५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर एकूण बरे झालेले रुग्ण- ११३४६ वर गेली आहे.
——————————————————
फोटोओळी : बारामती मोकार फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजेन तपासणी करण्यात येत आहे.
२३०४२०२१-बारामती-०७
————————————————
फोटोओळी : बारामती शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाच्या सन्मवयातून अँटिजन चाचणी करण्यात येत आहे.
२३०४२०२१-बारामती-०८
————————————————