अनुराग कश्यप, तापसी पन्नूच्या आर्थिक व्यवहारात ३०० कोटींची अनियमितता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 05:04 AM2021-03-05T05:04:44+5:302021-03-05T05:05:02+5:30

अनुराग कश्यप व तापसीची पुण्यातील एका हॉटेलात  अधिकाऱ्यांकडून गुरुवारीही चौकशी करण्यात आली. त्यांचे मोबाइल व लॅपटॉप जप्त करण्यात आले.

Anurag Kashyap, tapsi pannu Irregularity of Rs 300 crores | अनुराग कश्यप, तापसी पन्नूच्या आर्थिक व्यवहारात ३०० कोटींची अनियमितता

अनुराग कश्यप, तापसी पन्नूच्या आर्थिक व्यवहारात ३०० कोटींची अनियमितता

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिगदर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू, विकास बहल आदींच्या घर व कार्यालयांवरील आयकर विभागाच्या छाप्याची कारवाई गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरू   आहे. आतापर्यंतच्या  त्यांच्या कंपनीची  मिळकत आणि आर्थिक व्यवहारात ३०० कोटींवर अनियमितता आढळून आली. २०११ ते २०१८ या वर्षांतील करचुकवेगिरी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.


अनुराग कश्यप व तापसीची पुण्यातील एका हॉटेलात  अधिकाऱ्यांकडून गुरुवारीही चौकशी करण्यात आली. त्यांचे मोबाइल व लॅपटॉप जप्त करण्यात आले. आयकर विभागाने बुधवारी    मुंबई- पुण्यासह दिल्ली, हैदराबाद आदी विविध ३० ठिकाणी  छापे मारले. त्यामध्ये दोघांसह विकास बहल,  क्वान टलेंट मॅनेजमेंट कंपनीच्या मधू मंटेना यांच्याही मालमत्तेचा  समावेश आहे. त्यांनी २०१५ मध्ये  फँटम हा चित्रपट बनविला होता. त्यांच्याशी संबंधित व्यवहारावरून  त्यांच्या घरांची आयकर अधिकारी झाडाझडती घेत आहेत. 


जवळपास ३०० कोटींचा हिशोब त्यांनी आयकर विभागाकडे सादर केलेला नाही. त्याचबरोबर तापसीला व्यवहारात ५ कोटी रोकड मिळाली होती, असे सांगण्यात आले.
अनुराग कश्यप, तापसी पन्नूने केंद्र सरकारच्या  अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात  नेहमी उघडपणे भूमिका मांडली आहे. एनआरसी, सीएएविरोधी कायदा, शेतकऱ्याचे आंदोलनबाबत ट्वीट करून भूमिका मांडली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याची  टीका विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. 

पुण्यात चौकशी
पुणे : फॅन्टम फिल्म कंपनीच्या कथित कर चुकवेगिरी प्रकरणामध्ये बुधवारी सकाळपासून दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नूची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये चौकशी सुरू आहे. ही चौकशी शुक्रवारीही सुरू राहण्याची शक्यता प्राप्तिकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली. दोघेही चित्रीकरणासाठी पुण्यात आलेले आहेत. त्यांचा हिंजवडी परिसरातील हॉटेलमध्ये मुक्काम आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या हॉटेलमध्येच त्यांना गाठत चौकशी करण्यास सुरुवात केली. 

Web Title: Anurag Kashyap, tapsi pannu Irregularity of Rs 300 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.