निवडणुका व्यतिरिक्त पण गुजराती समाजाशी सौहार्द संबंध ठेवा; फडणवीसांचा शिवसेनेला चिमटा

By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: January 11, 2021 07:31 PM2021-01-11T19:31:12+5:302021-01-11T20:01:47+5:30

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आपडा' वर निशाणा..

Apart from elections, maintain cordial relations with the Gujarati community; Fadnavis tweaks Shiv Sena | निवडणुका व्यतिरिक्त पण गुजराती समाजाशी सौहार्द संबंध ठेवा; फडणवीसांचा शिवसेनेला चिमटा

निवडणुका व्यतिरिक्त पण गुजराती समाजाशी सौहार्द संबंध ठेवा; फडणवीसांचा शिवसेनेला चिमटा

googlenewsNext

लोणावळा: मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे पडघम आता वाजू लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ते मात्र ते करत असताना एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील झाडू लागल्या आहेत. शिवसेनेकडून नुकताच जोगेश्वरी येथे गुजराती बांधवांचा मेळावा घेण्यात आला होता. त्यावरून भाजपच्या देवेंद्र फडणवीसांसह अनेक वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते.  मात्र आता पुन्हा एकदा फडणवीसांनी शिवसेनेला गुजराती मेळाव्यावरून चिमटा काढला आहे. 

लोणावळा येथे आयोजित भाजपच्या एका कार्यक्रमाला ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. फडणवीस म्हणाले, मुंबई महापालिकेच्या निवडणुकांना समोर ठेवून का होईना शिवसेना 'गुजराती समाजाला आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न करत आहे. ही आनंदाची बाब आहे. ते पण आपलेच नागरिक आहेत. मात्र, फक्त निवडणुकांच्या तोंडावर गुजराती समाजाशी सौहार्द न ठेवता त्या व्यतिरिक्त देखील त्यांच्याशी गुजराती समाजाशी सौहार्द संबंध ठेवले पाहिजे अशा शब्दात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना 'जनाब' बाळासाहेब ठाकरे केलवे आहे. तसेच ऊर्दू भाषेत कॅलेंडर देखील काढली आहेत. एकप्रकारे शिवसेनेकडून ही सर्व प्रकारची नौटंकी सुरु आहे. पण लोकांना या गोष्टी समजतात. असेही फडणवीस महायानी यावेळी सांगितले. 
 
एकीकडे अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनला कडाडून विरोध करायचा अन् दुसरीकडे...
देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने रविवारी जोगेश्वरी येथे 'मुंबई मा जलेबी ना फापडा, उद्धव ठाकरे आपडा' या प्रकारची टॅगलाइन वापरून आयोजित केलेल्या गुजराती भाषिकांच्या मेळाव्यावरून सुद्धा शिवसेनेला चिमटा काढला. ते म्हणाले, अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनला एकीकडे कडाडून विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूला गुजराती समाजाला आपलेसे करायचा प्रयत्न करायचा. परंतू, नागरिक कृतीतून आपलेसे होतात, अशा कार्यक्रमांनी नव्हे. 

Web Title: Apart from elections, maintain cordial relations with the Gujarati community; Fadnavis tweaks Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.