वडापाव तळायचे सोडून चक्क कढईच घातली डोक्यात; पती गंभीर जखमी

By विवेक भुसे | Published: September 20, 2023 05:33 PM2023-09-20T17:33:50+5:302023-09-20T17:34:15+5:30

वडापावची हातगाडी लावण्यावरून वाद झाल्यावर थेट वडापाव तळण्याची कढई डोक्यात घातली

Apart from frying the vada pav they put a kadai in the head Husband seriously injured | वडापाव तळायचे सोडून चक्क कढईच घातली डोक्यात; पती गंभीर जखमी

वडापाव तळायचे सोडून चक्क कढईच घातली डोक्यात; पती गंभीर जखमी

googlenewsNext

पुणे : हातगाडी लावण्यावरून झालेल्या वादात महिलेला मारहाण करण्यात आली, तसेच तिच्या पतीच्या डोक्यात वडापाव तळण्याची कढई मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत दीपाली गणेश मगर (वय २८, रा. कारगील सोसायटी, वारजे माळवाडी) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सिद्धार्थ साळुंखे, संग्राम साळुंखे, उत्तरा साळुंखे (रा. सदाशिव पेठ) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हत्ती गणपती चौकातील ज्ञान प्रबोधिनीच्या बाजूला मंगळवारी दुपारी साडेचार वाजता घडला.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी या पूर्वी ज्ञान प्रबोधिनीसमोरील बाजूला हातगाडीवर खाद्य पदार्थ विक्रीचा व्यवसाय करत होत्या. आता गणेशोत्सव सुरू होत असल्याने फिर्यादी या हातगाडी पुन्हा लावत होत्या. त्यावेळी हातगाडी मालकीण कल्पना जाधव याही तेथे होत्या. हातगाडी लावू नये या कारणावरून वाद झाला. यावर आराेपीने फिर्यादी व हातगाडी मालकीण कल्पना जाधव यांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांचे पती गणेश मगर यांच्या डोक्यात पाठीमागून येऊन वडापाव तळण्याची कढई मारून गंभीर जखमी केले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक फरताडे तपास करीत आहेत.

Web Title: Apart from frying the vada pav they put a kadai in the head Husband seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.