मतदानाचा हक्क बजावण्याबाबत अनास्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:14 AM2021-01-16T04:14:26+5:302021-01-16T04:14:26+5:30
हवेली तालुक्यात ५४ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सुमारे अकराशे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्ती केलेली आहे, ...
हवेली तालुक्यात ५४ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सुमारे अकराशे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्ती केलेली आहे, या मंडळींना जर पोस्टाने मतदान करावयाचे असेल तर १० तारखेपर्यंत अर्ज देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते, हवेली तालुक्यातील सुमारे ११०० लोकांना निवडणुकीचे कामकाज दिले आहे? व ते या निवडणुकीत आपल्या राहत्या गावी मतदानापासून वंचित राहणार असल्याने त्यांना दहा तारखेपूर्वी पोस्टाने मतदान करण्यासाठीचे अर्ज देण्यास व पोस्टल बलेट पेपर प्राप्त करून घेणे गरजेचे आहे, असे सांगितले होते. परंतु सुमारे ११०० पैकी केवळ २८ जणांनी अर्ज देऊन आपले मतदान पोस्टल बॅलेट पेपरद्वारे पार पाडण्याची जबाबदारी वा कर्तव्य पार पाडले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. ही बाब हवेली तालुक्यातील आहे? तर जिल्ह्यातील अन्य तालुक्यातूनही जर अशी परिस्थिती असेल तर जिल्हा प्रशासनाकडून याची दखल घेतली जाणार आहे? का असा सवाल उपस्थित झाला आहे?
मात्र पहिल्यांदाच ही निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्ती झालेल्या काही शिक्षकांनी याबाबत सांगितले की आम्हाला निवडणूक कामकाज कसे पार पाडायचे याचे प्रशिक्षण देताना या पोस्टल मतदानाबाबत काहीही माहिती दिली गेली नाही त्यामुळे आम्ही या मतदानापासून वंचित राहणार आहोत याचे दु:ख वाटते.