वनखात्याची अनास्था, हजारो झाडे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:10 AM2021-04-03T04:10:28+5:302021-04-03T04:10:28+5:30

गुरुवार (१ एप्रिल) रोजी दुपारी येथील श्रीक्षेत्र रामदरानजीकच्या डोंगरावरील लक्ष्मीदरा परिसरात वणवा लागल्याने हिरव्यागार शालूने पावसाळ्यात बहरलेल्या ...

The apathy of the forest department, burning down thousands of trees | वनखात्याची अनास्था, हजारो झाडे जळून खाक

वनखात्याची अनास्था, हजारो झाडे जळून खाक

Next

गुरुवार (१ एप्रिल) रोजी दुपारी

येथील श्रीक्षेत्र रामदरानजीकच्या डोंगरावरील लक्ष्मीदरा परिसरात वणवा लागल्याने हिरव्यागार शालूने पावसाळ्यात बहरलेल्या आणि सध्या पांढऱ्या गवताच्या आच्छादलेल्या या डोंगराची अवस्था अत्यंत भीषण झाली होती. वनअधिकारी यांनी कर्मचारी असे एकूण सुमारे २० जणंांनी दक्षता घेतल्याने सदर आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी सुमारे ३ हेक्टर परिसरातील वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

वणवा विझवल्यानंतर सर्व वनकर्मचारी घरी परतल्यानंतर रात्री पुन्हा वणवा पेटला व आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे ही आग आज दुपारी रामदरा परिसरातून आळंदी म्हातोबाची रामवाडी परिसरातील सोनोरी किल्ला परिसरात पोहोचली. वनखात्याच्या तोकड्या कर्मचारी यांनी सदर वणव्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु वाऱ्याचा वेग अधिक असल्याने त्यांचे हे प्रयत्न असफल ठरले.

सदर वणव्याने मध्यरात्रीनंतर रौद्ररूप धारण केल्याने वन कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक परिश्रमाला दाद मिळाली नाही. त्यातच वाऱ्याची साथ मिळाल्याने वणवा आणखी भडकला व त्याने आळंदी म्हातोबाचीकडे आगेकूच केली. त्यामुळे नेहमी हिरवागार दिसणारा डोंगर आता काळा राखेने माखला गेला. त्यामुळे सर्वत्र नजर पोहोचेल तेथपर्यंत केवळ काळाकुट्ट डोंगरच दिसू लागला आहे.

वणवा लागल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र कार्यालय पुणेचे वनपाल, वनरक्षक वनकर्मचारी आदी तात्काळ सदर ठिकाणी पोहोचले. ब्लोअर मशीन, पोती व झाडांच्या फांद्या यांचे सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतू आगीला वा-याची साथ मिळाल्याने त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. यांमुळे या डोंगरातील खैर, करवंद, कडुनिंब, चंदन, टंटणी, वेगवेगळ्या प्रजातीच्या बाभळी यांचेसमवेत अनेक झाडांना याची झळ पोहोचली. याचबरोबर या परिसरात आढळून येत असलेल्या मोर, ससा, हरीण, कोल्हा, लांडगा, तरस, सायाळ, मुंगुस, रानडुक्कर, साप छोटे छोटे कीटकनाशक, सरपटणारे प्राणी आदी पशुपक्ष्यांनाही याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला. आज दुपारी या परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली असता केवळ कर्मचारी आगीशी झुंज देताना दिसत होते. वरिष्ठ कार्यालयातील कोणीही अधिकारी या परिसरात फिरकला नसल्याचे निदर्शनास आले. वनखात्याच्या वतीने झाडे लावण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. परंतु मोठी झाडे जळत असताना त्यांना वाचवण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही ही शोकांतिका असल्याचे मत आळंदी म्हातोबाची परिसरातील एका जेष्ठ नागरिकाने व्यक्त केले.

Web Title: The apathy of the forest department, burning down thousands of trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.