माफीच्या साक्षीदाराला शिक्षेचा प्रश्नच नाही

By admin | Published: May 11, 2017 04:53 AM2017-05-11T04:53:37+5:302017-05-11T04:53:37+5:30

माफीचा साक्षीदार राजेश चौधरी याच्यावर दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. तो आरोपी नव्हता, साक्षीदार होता. त्यामुळे त्याला

An apology witness is not a question of punishment | माफीच्या साक्षीदाराला शिक्षेचा प्रश्नच नाही

माफीच्या साक्षीदाराला शिक्षेचा प्रश्नच नाही

Next

पुणे : माफीचा साक्षीदार राजेश चौधरी याच्यावर दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. तो आरोपी नव्हता, साक्षीदार होता. त्यामुळे त्याला शिक्षा होण्याचा प्रश्नच नाही, असे नयना पुजारी खून खटल्यातील विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी बुधवारी स्पष्ट केले.
मुख्य आरोपी योगेश राऊत याने आपल्याबरोबर माफीचा साक्षीदार राजेश चौधरी यालाही शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. नयना पुजारी यांचे पती अभिजित यांच्यासह काही महिला लोकप्रतिनिधींनीही चौधरी यालाही शिक्षा देण्याची मागणी केली आहे. निंबाळकर म्हणाले, ‘‘न्यायालयाने त्याला साक्षीदार केलेले आहे. त्याच्याविरुद्ध खटला चाललेला नाही. तो आरोपी नसल्याने त्याला शिक्षा होण्याचा प्रश्नच नाही.’’

Web Title: An apology witness is not a question of punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.