माजी विद्यार्थ्यांना जोडणार अॅप
By Admin | Published: October 6, 2016 04:02 AM2016-10-06T04:02:09+5:302016-10-06T04:02:09+5:30
माजी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकत्र आणण्याची किमया मोबाईल अॅपच्या माध्यमातून साधली जाणार आहे. नूतन मराठी विद्यालयातील माजी विद्यार्थ्याने ‘आम्ही नूमवीय’
पुणे : माजी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकत्र आणण्याची किमया मोबाईल अॅपच्या माध्यमातून साधली जाणार आहे. नूतन मराठी विद्यालयातील माजी विद्यार्थ्याने ‘आम्ही नूमवीय’ या अॅपची निर्मिती केली आहे. माजी विद्यार्थ्यांना जोडणाऱ्या या अॅपचे अनावरण माजी विद्यार्थी कॅप्टन डॉ. चंद्रशेखर चितळे यांच्या हस्ते करण्यात आले.
‘आम्ही नूमवीय’ या संस्थेच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांना एकत्रित आणण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. त्याअनुषंगाने माजी विद्यार्थी हरेश गुजराथी यांनी ‘आम्ही नूमवीय’ या अॅपची निर्मिती केली आहे. विद्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात या अॅपचे अनावरण झाले. या वेळी शिक्षण प्रसारक मंडळीचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, आम्ही नूमवीय संस्थेचे अध्यक्ष अजित रावेतकर, सचिव मिलिंद शालगर, डॉ. पराग माणकीकर, सहसचिव सचिन हळदुले, मुख्याध्यापिका आशा रावत यांच्यासह शाळेचे माजी शिक्षक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. चितळे यांनी या वेळी बोलताना संस्थेतर्फे शाळेमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांविषयी समाधान व्यक्त केले. श्रीकृष्ण चितळे यांनी संस्थेच्या सर्व कार्यक्रमांना पाठिंबा जाहीर
केला.
नूमवीयांचा माजी विद्यार्थी महामेळावा दि. ८ जानेवारी २०१७ रोजी होणार असल्याचे रावेतकर व शालगर यांनी या वेळी जाहीर केले. मेळाव्यामध्ये होणाऱ्या उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)